सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, शहजादची फेस रेकग्निशन टेस्ट पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शहजादचा फेस रेकग्निशन टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 31, 2025, 12:49 PM IST
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, शहजादची फेस रेकग्निशन टेस्ट पॉझिटिव्ह title=

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शहजादचा एफआरटी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.याचाच अर्थ सैफ अली खानच्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती आणि अटक करण्यात आलेला शहजाद एकच आहे. फेस रेकग्निशन टेस्टमध्ये शहजादचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या आरोपीच्या चेहऱ्याशी जुळला आहे.

त्यामुळे अटक आरोपी आणि सैफच्या घरातील आरोपी एकच असल्याचं स्पष्ट झालंय.सैफवर हल्ला करणारा आरोपी आणि अटक करण्यात आलेलला आरोपी वेगवेगळा असल्याचं सांगण्यात येत होतं.मात्र आता दोन्ही आरोपी एकचक असल्याचं स्पष्ट झालंय.

अटक आरोपीबाबत वकिलांनी न्यायालयात केला होता प्रश्न उपस्थित 

शहजादचे वकील दिनेश प्रजापती यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अटक आरोपींबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सैफच्या घरातून सापडलेले सीसीटीव्ही फुटेज आणि अटक आरोपीचे छायाचित्र न्यायालयात दाखवून वकिलांनी सांगितले की, पोलिसांनी पकडलेली व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी आहे. दोघांची छायाचित्रे जुळत नसल्याने पोलिसांनी चुकीची अटक केली आहे. आरोपींना अटक करण्यापूर्वी कायदेशीर नियमांचे पालन करण्यात आले नाही. असे आरोपीच्या वकीलांनी सांगितले. 

16 जानेवारीला सैफवर झाला होता हल्ला

16 जानेवारीला सैफ अली खानच्या वांद्रे येथील इमारतीत एका चोराने घुसून सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच दिवसांनंतर सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच तो बरा होऊन घरी परतला आहे. त्यानंतर 24 जानेवारी रोजी पोलिसांनी सैफ अली खानचा पहिला जबाब नोंदवला.