Salman Khan Sanjay Dutt Film Dus: 90 च्या दशकात मल्टी स्टार कास्ट असलेल्या चित्रपटांची चांगलीच क्रेझ होती. चित्रपटात एकापेक्षा अनेक अभिनेते असायचे आणि अशा सिनेमांना प्रेक्षकही प्रतिसाद द्यायचे. त्यामुळं चित्रपटात एकापेक्षा जास्त कलाकार म्हणजे सिनेमा हिट होण्याची गँरटी असायची. सलमान खान आणि संजय दत्त हे त्या काळातील मोठे अभिनेते होते. साजन, चल मेरे भाई, ये है जलवा, सन ऑफ सरदार आणि रेडी सारख्या चित्रपटात दोघे दिसले होते. मात्र या दोघांचा एक चित्रपट असा आहे ज्याचे चित्रीकरण पूर्ण झाले मात्र हा सिनेमा कधीच रिलीज होऊ शकला नाही.
संजय दत्त आणि सलमान खान यांचा हा सिनेमा कधीही रिलीज झाला नसला तरी या सिनेमातील देशभक्तीपर गाणी खूप गाजली होती. आजही ही गाणी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाजवली जातात. 1997 साली संजय दत्त, सलमान खान आणि रवीना टंडन यांनी चित्रपट 'दस'मध्ये काम केलं होतं. चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले होते. मात्र सिनेमा कधीच रिलीज झाला नाही.
चित्रपट रिलीज होऊ शकला नाही कारण चित्रपटाचे दिग्दर्शक मुकुल आनंद. चित्रपटातील गाण 'सुनो गौर से दुनिया वालो' यातून शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. तेव्हा हे गाण खूप चर्चेत होते आणि लोकप्रियदेखील झाले होते. आजदेखील हे गाण खूप ऐकलं जातं.
बुक माय शोच्या एका रिपोर्टनुसार, रवीना टंडन दस चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत होती. तर सलमान खान आणि संजय दत्त भारतीय लष्करात अधिकारी होते. चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण जेव्हा टीम यूटामध्ये शुटिंग करत होते तेव्हाच दिग्दर्शक मुकुल आनंद यांना स्ट्रोक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. चित्रपटाचे शीर्षक निर्माते नितीन मनमोहन देसाई यांच्याकडेच होते.
2005 साली त्यांनी संजय दत्त, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन, जायद खान, शिल्पा शेट्टी, ईशा देओल, दीया मिर्झा आणि रायमा सेन यांना घेऊन याच नावाने एक चित्रपट प्रदर्शित केला. रिपोर्ट्सनुसार, अनुभन सिन्हा यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून हा अॅक्शन, थ्रिलर चित्रपट लोकप्रिय दिग्दर्शक मुकुल आनंद यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पित केली.