Lucky Ali Marriage : लोकप्रिय गायक लकी अलीची गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यासोबत लकी अलीचं खासगी आयुष्या देखील तितकंच चर्चेत असतं. लकी अलीनं आता चौथ्यांदा लग्न करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. लकी अलीनं नुकतीच दिल्लीच्या सुंदर नर्सरीमध्ये झालेल्या 18 व्या कथाकार इंटरनॅशनल स्टोरीटेलर फेस्टिवलमध्ये सहभागी झाला होता. इतकंच नाही तर चौथ्यांदा लग्न करण्यावारून देखील त्यानं वक्तव्य केलं. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
लकी अलीनं फक्त त्याच्या परफॉर्मेंसमध्ये सगळ्यांची मने जिंकली. इतकंच नाही तर काही हिट गाणी देखील गायली आणि त्या मागचे मजेशीर किस्से देखील सांगितलं. या दरम्यान, जेव्हा लकी अलीला त्याच्या स्वप्नांविषयी विचारण्यात आलं तर त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं. लकी अलीनं सांगितलं की माझं स्वप्न हे आहे की मी पुन्हा एकदा लग्न करावं.
लकी अलीनं केलेल्या या वक्तव्यानंतर तो चौथ्यांदा लग्न करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. लकी अलीनं पहिल्यांदा 1996 मध्ये लग्न केलं. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव मेगन जेन मेकलरी असं होतं. मेगन ही ऑस्ट्रेलियाची राहणारी होती. मेगन आणि लकी अलीला दोन मुलं आहेत. दोघांची भेट ही लकी अलीच्या एल्बम 'सुनो' च्या दरम्यान, झाली होती आणि मग त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या काही काळानंतर ते विभक्त झाले.
हेही वाचा : अक्षय कुमारनं विकला वरळीतील आलिशान फ्लॅट; कोटींमध्ये केली Deal
लकी अलीनं 2000 मध्ये एका पारसी महिला अनाहिताशी दुसरं लग्न केलं. लकी अलीनं अनाहिताशशी दुसरं लग्न केलं. तर या लग्नासाठी अनाहितानं लकी अलीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नाव बदलत इनाया ठेवलं. या लग्नातून लकी अलीला आणखी दोन मुलं झाली. त्यानंतर 2010 मध्ये लकी अलीनं केट एलिजाबेथ हलमशी लग्न केलं. पण 2017 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर एलिजाबेथनं देखील लग्नानंतर स्वत: चं नाव आयशा अली ठेवलं. एलिजाबेथ ही लकी अली पेक्षा वयानं 24 वर्ष लहान होती. त्यांना एक मुलगा देखील आहे. अशात आता लकी अलीनं चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.