'हा पाकिस्तान आहे, माणूस असो किंवा घोडा...', जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज

नुकताच 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील जॉन अब्राहमची भूमिका त्याच्या नेहमीच्या अ‍ॅक्शनने भरलेल्या अभिनयापेक्षा वेगळी असणार आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 7, 2025, 04:45 PM IST
'हा पाकिस्तान आहे, माणूस असो किंवा घोडा...', जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज title=

The Diplomat : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम नेहमी त्याच्या अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटांनी चर्चेत असतो. 2024 मध्ये अभिनेत्याचा 'वेदा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला संमीश्र प्रतिसाद मिळाला होता. त्याच्या अभिनयाचं कौतुक देखील झालं होतं. अशातच नवीन वर्षात 2025 मध्ये जॉन अब्राहमचा आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा टीझर शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. 'द डिप्लोमॅट' चित्रपटाच्या टीझरमध्ये सुरुवातीला परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर हे जगातील सर्वात मोठा डिप्लोमॅट कोण? एक म्हणजे श्रीकृष्ण होते आणि दुसरे हनुमानजी होते असे सांगताना दिसत आहेत. तर पुढे टीझरमध्ये अभिनेता जॉन अब्राहमची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. 

जॉन अब्राहम या टीझरमध्ये एका डिप्लोमॅटच्या भूमिकेत दिसत आहे. अशातच एक महिला बुरखा परिधान करून स्वत: ला भारतीय नागरिक असल्याचं सांगत आहे. ज्यामध्ये जॉन अब्राहम त्या महिलेची चौकशी करताना दिसत आहे. त्यानंतर जॉनच्या मागे काही लोक लागलेले दिसत आहेत. त्यावेळी जॉन म्हणतो की, ये पाकिस्तान है बेटा, आदमी हो या घोडा, सीधा नहीं चलता है, हमेशा ढाई कदम असं बोलताना तो दिसत आहे. 

'द डिप्लोमॅट' चित्रपट या दिवशी रिलीज होणार

सध्या सोशल मीडियावर जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' चित्रपटाच्या टीझरची प्रचंड चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'द डिप्लोमॅट' हा चित्रपट 7 मार्च 2025 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात सदिया खतीब, रेवथी, कुमुद मिश्रा, शरीब हाश्मी हे कलाकार देखील असणार आहेत. फॉरच्यून पिक्चर्स, वकाऊ फिल्म प्रॉडक्शन, टी सीरिज आणि जेए एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर शिवम नायर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 

जॉन अब्राहमच्या या चित्रपटाच्या टीझरवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी तू खूप छान दिसत आहे. तर काही चाहत्यांनी जॉन या चित्रपटाच्या टीझरमध्ये पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसत असल्याचं म्हटलं आहे.