Marathi Community: कथाकार वाचिका देवी भव्याजी मैथलानी यांनी मराठी समाजाबाबत केलेल्या टिप्पणीबाबत एकच वाद निर्माण झाला होता. सूरतमध्ये एका कार्याक्रमात त्यांनी मराठी समाज आणि पशुप्रती व्रत आणि पुजासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं मोठा तणाव निर्माण झाला होता. वादग्रस्त विधानानंतर अखेर त्यांनी माफी मागितली आहे.
भव्याजी मैथलानी यांनी एका कार्यक्रमात मराठी समाजाला उद्देशून म्हटलं होतं की, 'आजच्या काळात सगळ्यात जास्त मराठी समाजातील लोक पशुपती व्रत करतात आणि सगळ्यात जास्त तेच लोक खाता. ते लोक मच्छी सुकवूनदेखील खातात. त्यामुळं मच्छिचा वास येतो. मी गुजराती परिसरात राहते पण त्या दिवशी असं वाटतं की मला आता गोविंदाने मृत्यू द्यावा.' त्यांच्या याच वक्तव्यामुळं मराठी समाजाचा भावना दुखावल्या असल्याचा आरोप आहे.
भव्या यांनी पुढे म्हटलं आहे की, कदाचित माझं म्हणणं तुम्हाला वाईट वाटेल. तुम्ही मला काठीने माराल पण सत्य बोलणाऱ्यांलाच मारलं जातं. सगळ्यात जास्त मांस मराठी लोक खातात. सुकवून (मच्छी) पण खातात आणि सगळ्यात जास्त पशुपती व्रत हेच मराठी लोक करते आही. फिरवून फिरवून हलवा पुरीचा नैवेद्य महादेवाला दाखवून देवाला म्हणतात की मला माफ करा, पण कसा देव माफ करेल? असं त्यांनी म्हटलं होतं.
भव्या यांच्या या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, काल मी मराठी समाजाबाबत काही वक्तव्य केली होती. मी म्हटलं होतं की जर पशुपती व्रत आणि धर्म करत असाल तर कृपया करुन नका खावू. पण या वक्तव्यामुळं जर मराठी समाजाला भावनांना ठेच पोहोचली असेल तर मी माफी मागते. माझ्याकडून काही चुक झाली असेल तर तुमची मुलगी किंवा बहिण समजून मला माफ करा.
पशुपती व्रत हे भगवान भोलेनाथ यांच्यासाठी केले जाते. दर सोमवारी हे व्रत ठेवलं जातं. हे व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. कोणत्याही महिन्याच्या सोमवारपासून हे व्रत करता येऊ शकते. 5 सोमवार हे व्रत केले जाते. पहिल्या सोमवारी एखाद्या मंदिरात पूजा केल्यानंतर त्याच मंदिरात पुढील चार सोमवारही पूजा केली पाहिजे.