कालिन भैय्याची बायको आहे खूपच सुंदर, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल OMG

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी आज कोणाला माहीत नाही. दमदार अभिनयाच्या जोरावर पंकजने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Updated: Jan 19, 2023, 04:28 PM IST
कालिन भैय्याची बायको आहे खूपच सुंदर, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल OMG title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. पंकज यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Pankaj Tripathi Love Story) त्यांची लव्ह स्टोरी ही एका चित्रपटाच्या कहाणीसारखी आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात ही 10 वीत असताना झाली. त्या वयातच त्यांनी प्रेमविवाह करण्याचं ठरवलं होतं. 

कलिन भैय्याची पत्नी खूपचं सुंदर आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी आज कोणाला माहीत नाही. दमदार अभिनयाच्या जोरावर पंकजने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय प्रेक्षक त्यांना मिर्झापूरच्या कालिन भैय्या या नावानेही ओळखलं जातं.अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचं झालं तर त्याची पत्नी मृदुला त्रिपाठी खूपच सुंदर आहे. पंकज अनेकदा तिच्यासोबतचे फोटो पोस्ट करतो. दोघांच्या लग्नाला 17 वर्षे झाली आहेत.

पंकज त्रिपाठी आणि मृदुला त्रिपाठी यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे
पंकज त्रिपाठी आणि मृदुला त्रिपाठी यांची लव्हस्टोरी खूप खास आहे. एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला होता की, हे पहिल्या नजरेतलं प्रेम होतं. 1993 मध्ये बहिणीच्या लग्नात तो मृदुलाच्या प्रेमात पडला. माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि मी  बाल्कनीतून तिच्याकडे पाहिलं आणि माझ्या मनात विचार आला, ही ती स्त्री आहे जिच्यासोबत मला माझं पुढचं आयुष्य घालवायचं आहे. त्यावेळी ती कोण होती किंवा तिचं नाव काय होतं हेही मला माहीत नव्हतं.

पंकज त्रिपाठीने मृदुला त्रिपाठीशी लग्न केलं
जेव्हा पंकज त्रिपाठी मृदुला त्रिपाठीला पहिल्यांदा भेटला तेव्हा मृदुला नववीच्या वर्गात शिकत होती आणि पंकज तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता. 16 जानेवारी 2004 रोजी त्यांचं कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. 2006 मध्ये त्यांच्या घरी एका छोट्या पाहुणीचं आगमन झालं.  त्यांच्या मुलीचं नाव आशी त्रिपाठी असं आहे, जिच्यासोबत तो अनेकदा फोटो शेअर करत असतो.

पंकज त्रिपाठी यांची पत्नी खूप सुंदर आहे
पंकज त्रिपाठीची पत्नी मृदुला त्रिपाठी अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहे. पंकज नेहमीच तिच्यासोबत रोमँटिक फोटो शेअर करत असतो.   ती वेस्टर्न ड्रेसदेखील उत्तम प्रकारे कॅरी करते. सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिची मुलगी आणि पतीसोबतचे अनेक फोटो आहेत.