महाविद्यालयीन दिवसांत ड्रग्स देवून शारीरिक शोषण, अभिनेत्रीचा खुलासा

कॉलेजच्या आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला चांगले वाईट अनुभव येत असतात.

Updated: Sep 11, 2019, 12:28 PM IST
महाविद्यालयीन दिवसांत ड्रग्स देवून शारीरिक शोषण, अभिनेत्रीचा खुलासा

मुंबई : नुकताच प्रसिद्ध अभिनेत्री कैमिला मेंडेसने स्वत:च्या खाजगी जीवनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. कॉलेजच्या आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला चांगले वाईट अनुभव येत असतात. परंतू नेटफ्लिक्स फेम कैमिलाला अत्यंत धक्कादायक परिस्थतीचा सामना कॉलेजच्या दिवसात करावा लागला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिने तिच्यासोबत घडलेल्या परिस्थितीचा खुलासा केला आहे. न्यूयॉर्कमधील 'Tisch School of The Arts'मध्ये शिक्षण घेत होती. कॉलेजच्या सुरूवातीच्या दिवसांत तिचे शारीरिक शोषण झाले होते. 

घडल्याप्रसंगी भाष्य करताना करताना ती म्हणाली की, 'कॉलेजमधील प्रथम वर्ष फार कठीण होतं. मी अत्यंत वाईट प्रसंगांना तोंड दिले आहे. एका व्यक्तिने ड्रग्स देवून माझं शारीरिक शोषण केलं होतं.' घडल्या प्रकरणी जास्त काही न सांगता तिने स्वत:ला सशक्त बनवण्यासाठी अधिक मेहनत घेण्याचे ठरवले आहे. 

त्यासाठी तिने तिच्या पाठीवर 'to build a home' असे टॅटू देखील काढले आहे. स्पॉट बॉयने दिलेल्या वृत्तानुसार अनेकांसाठी आदर्श बनण्याची तिची इच्छा आहे. तिचा टॅटू नेहमी तिच्या प्रेरणास्तानी असल्याचं तिने म्हटले आहे. शिवाय आपल्यासोबत तिच्या आजुबाजूच्या व्यक्तिंना देखील सशक्त बनवण्याचा तिचा मानस आहे.