Rakesh Roshan Beat Hrithik In Front Of His Friends: अभिनेता हृतिक रोशन सध्या 'विक्रम वेधा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हृतिक (Hrithik Roshan) आणि त्याचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) या दोघांचं चांगलं बॉन्डिंग आहे. दोघं सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्ट शेअर करतात. राकेश रोशननं हृतिकवर कधीच हात उचलला नाही किंवा साधं ओरडलं सुद्धा नाही. पण एका घटनेमुळे राकेश रोशन यांना राग अनावर झाला आणि त्यांनी ऋतिक रोशनवर हात उचलला होता. रागाचा पारा इतका चढला होता की, त्यांनी मित्रांसमोरच धु धु धुतलं. एका मुलाखतीदरम्यान हृतिक रोशननं याबाबतचा खुलासा केला होता.
हृतिक रोशननं सांगितलं की, 'एकदा आम्ही मित्र घरी पार्टी करत होतो. मस्ती करता करता आम्ही काचेच्या बाटल्या छतावरून खाली फेकण्यास सुरुवात केली. जेव्हा वडिलांनी हे दृश्य पाहिलं तेव्हा त्यांना राग आला. त्यांनी मित्रांसमोरच मला मारलं. पण हा मार पहिला आणि शेवटचा होता. त्यानंतर त्यांनी कधीच हात उचलला नाही.'
'या' अभिनेत्रीला KISS करताना आमिर खानला फुटला होता घाम, वाचा संपूर्ण किस्सा
हृतिक रोशन आपल्या वडिलांना प्रेरणास्थान मानतो. राकेश रोशनने हृतिकला नेहमीच योग्य मार्ग दाखवला. जेव्हा हृतिकनं चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हाही राकेश रोशन यांनी स्वागत केलं.