OTT Release: 'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', बॉक्स ऑफिसनंतर OTT वर सर्वात प्रथम कोणता चित्रपट येणार?

दिवाळीमध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' आता ओटीटीवर देखील धुमाकूळ घालणार आहेत. 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 19, 2024, 02:31 PM IST
OTT Release: 'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', बॉक्स ऑफिसनंतर OTT वर सर्वात प्रथम कोणता चित्रपट येणार?  title=

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' दोन्ही चित्रपट दिवाळीच्या दिवसांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीपासूनच या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. परंतु, आता 'सिंघम अगेन' चित्रपटाची कमाई कमी होताना दिसत आहे. तर कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांनी थिएटरमध्ये पाहिले आहेत. पण आता हे दोन्ही चित्रपट प्रेक्षक ओटीटीवर रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. 

निर्मात्यांनी अजून या चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा केलेली नाहीये. तसेच ओटीटी फ्लेटफॉर्म संदर्भात देखील अजूनही निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. परंतु, असं म्हटलं जात आहे की, 'भूल भुलैया 3'ची शेवटची फ्रँचायझी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली असल्याने तीही याच दिवशी रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

'सिंघम अगेन' कुठे प्रदर्शित होणार 

अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपटाबद्दल बोलायचे म्हटले तर या चित्रपटाचा पहिला भाग 2011 मध्ये आला होता. त्यानंतर तो Amazon Prime वर प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच या चित्रपटाचा सिक्वेल देखील जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता 'सिंघम अगेन' संदर्भात बोलायचं म्हटलं तर या चित्रपटाच्या पोस्टरवर प्राइम व्हिडीओचा लोगो आहे. ज्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की, 'सिंघम अगेन' हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर रिलीज होईल. परंतु, अद्याप निर्मात्यांनी याबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाहीये. 

कोणता चित्रपट होणार सर्वात प्रथम रिलीज

'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' हे दोन्ही चित्रपट ओटीटीवर जानेवारी 2025 मध्ये प्रदर्शित होणार. पण सर्वात प्रथम कोणता चित्रपट रिलीज होणार हे बॉक्स ऑफिसवरील कमाईवरून ठरणार आहे. 'सिंघम अगेन' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत नाहीये. त्यामुळे हा चित्रपट पहिल्यांदा रिलीज होऊ शकतो. 'भूल भुलैया 3' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे तो OTT वर येण्यास वेळ लागेल.