'प्रचाराच्या भाषणांमधील नको नको त्या शब्दांचे, हातवारे...', गिरीश ओक यांचा मतदारांनाच सवाल

Girish Oak Post On Election Rally Speech :  गिरिश ओक यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची एकच चर्चा...

दिक्षा पाटील | Updated: Nov 19, 2024, 01:50 PM IST
'प्रचाराच्या भाषणांमधील नको नको त्या शब्दांचे, हातवारे...', गिरीश ओक यांचा मतदारांनाच सवाल title=
(Photo Credit : Social Media)

Girish Oak Post On Election Rally Speech : गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणी ही विधानसभा निवडणूकीच्या निमित्तानं प्रचार करताना दिसत आहेत. राज्यात ठिकठिकाणी ते सभा घेताना दिसले. तर आता उद्या 20 नोव्हेंबर रोजी बुधवारी महाराष्ट्रात मतदान आहे. तर यावेळी प्रचाराला भक्त राजकारणी नाही तर अनेक कलाकार देखील दिसले. अनेक कलाकार हे काही पक्षांचे स्टार प्रचारक देखील होते. तर काही कलाकार हे निवडणूकीवर स्पष्टपणे मत मांडताना दिसतात. तर अशात ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांचं मत मांडत मतदारांनाच प्रश्न विचारले आहेत. 

डॉ. गिरीश ओक यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा डोळे बंद करून हात जोडल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला शेअर करत डॉ. गिरीश ओक यांनी कॅप्शन दिलं की 'मला पडलेला अजून एक भाबडा प्रश्न, चित्रपटांना, नाटकांना सेंसॅार आहे तसं या निवडणूक प्रचार, भाषणांना नाही का किंवा का नाही? अहो सध्या फार पंचाईत होते मुलां बरोबर कुठल्याही बातम्यांच्या चॅनलवर ही भाषणं बघताना,ऐकताना. त्या भाषणां मधल्या नको नको त्या शब्दांचे, हातवाऱ्यांचे अर्थ विचारतात मुलं. त्या पेक्षा चित्रपटाच्या आधी जसं पेरेंटल गायडंस 13+ 16+ 18+ येतं तसं निवडणूक आयोगानी या भाषणांच्या आधी टाकलं तर बरं होईल नाही का? का तर आम्हाला तर कळलेलंच आहे कुठले राजकीय जेष्ठ लोकप्रतिनिधी किती अनपार्लमेंटरी बोलतात ते मुलांनाही कळायला नको म्हणून हो. एक सुजाण नागरिक पेरेंटल जबाबदारी.' 

हेही वाचा : नयनतारानं Ex बॉयफ्रेंडमुळे सोडलेली चित्रपटसृष्टी; Documentry मध्ये धक्कादायक खुलासा

दरम्यान, डॉ. गिरीश ओक यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देताना दिसले. एक नेटकरी म्हणाला, 'सच्चा मतदार. आज पर्यंत कोण कोणाला न पडलेला प्रश्न मांडल्या बदल खुप प्रेम धन्यवाद'. दुसरा नेटकरी म्हणाला, 'एकदम टू द पॉईंट बोललात तुम्ही . पण दुर्दैवाने कारवाई करणार कोण?'. तिसरा नेटकरी म्हणाला, 'अशा गोष्टींची जाणीव होण्यासाठी संवेदनशील मन आणि सामाजिक भान असावं लागतं सर. ज्याचा आजकाल बहुतेकांमध्ये अभाव आहे. अगदी मोजक्या शब्दात योग्य मुद्दा मांडलात!' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'और ये लगा सिक्सर....... खरंच या गोष्टीची गरज आहे जितकी ती राजकारण्यांना आहे त्याहीपेक्षा कैक पटीनं ती न्यूज चैनल आणि त्याच्याशी निगडित व्यवसायिकांना आहे'