Mahakumbh : प्रयागराजमध्ये भक्तांचा मांदियाळी उसळलीय. प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 पूर्ण उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न होतोय. संगमात स्नान करण्यासाठी दररोज लाखो - कोटी भाविक येत आहेत. पण इथे सर्वात अधिक उत्सुकता नागा साधूंना पाहण्याची असते. कुंभ मेळाशिवाय नागा साधू एवढ्या मोठ्या संख्येने दिसून येत नाहीत. त्यामुळे यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य लोक उत्सुक असतात. महाकुंभ मेळा हा 13 जानेवारीला सुरु झाला असून या विशेष दिवसानंतर नागा साधू प्रयागराजमध्ये दिसणार नाहीत. त्यानंतर ते एका विशेष कार्य करतात आणि प्रयागराजनंतर नागा साधू परत कधी दिसणार याबद्दल जाणून घेऊयात. (Naga Sadhus will not be seen in Mahakumbh from February 3 they will leave Prayagraj for this work when will they be seen again)
नागा साधू सांसारिक सुखसोयी सोडून अध्यात्मात पूर्णपणे मग्न राहतात. ते जंगल, पर्वत आणि आश्रमात तपश्चर्या करत असतात. केवळ कुंभाच्या वेळीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी येतात. महाकुंभ 2025 मध्येही, हजारो नागा साधूंनी आधीच प्रयागराज गाठले असतं. मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी रोजी पहिले अमृतस्नान झालं. त्यानंतर 29 जानेवारीला दुसरं अमृतस्नान झालं. आता महाकुंभातील तिसरं अमृत स्नान बसंत पंचमीच्या दिवशी असणार आहे. याशिवाय माघ पौर्णिमा आणि फेब्रुवारीतील महाशिवरात्री हे दिवसही स्नानासाठी अत्यंत पवित्र मानले जातात. यावेळी मोठ्या संख्येने नागा साधू एकत्र जमतात.
या महाकुंभात तीन अमृतस्नानासाठी नागा साधू आले होते. पहिला स्नान 14 जानेवारीला, दुसरा 29 जानेवारीला आणि तिसरा आणि शेवटचा अमृतस्नान 3 फेब्रुवारीला होणार आहे. यानंतर नागा साधू परतीच्या प्रवासाला लागतात. बसंत पंचमीला स्नान करून नागा साधू प्रयागराज सोडतात. काही त्यांच्या आखाड्यात परततील, तर काही हिमालयात किंवा इतर ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी जातात. त्यामुळे जर कोणाला नागा साधूंना भेटायचं असेल तर त्याच्याकडे फक्त 3 फेब्रुवारीपर्यंतच वेळ असणार आहे.
एवढ्या मोठ्या गटात नागा साधूंना पुन्हा पाहायचे असेल, तर पुढची संधी 2027 च्या नाशिक कुंभमेळ्यात असणार आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर हा कुंभ आयोजित केला जाणार असून हजारो नागा साधू पुन्हा तेथे एकत्र येणार आहेत. याचा अर्थ महाकुंभ 2025 नंतर तीन वर्षे नागा साधू इतक्या मोठ्या संख्येने सार्वजनिक ठिकाणी दिसणार नाहीत.