Budget 2025 : मागील काही वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ सामान्यांच्या खिशाला चाप लावताना दिसत होती. परिणामी अनेक वाहनधारक आणि वाहन खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांनीच इलेक्ट्रीक वाहनांकडे आपला मोर्चा वळवला. ही संपूर्ण स्थिती पाहता आणि भविष्यातील काही मुद्द्यांचा आढावा घेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या 2025 - 26 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात विशेष घोषणा केल्या.
इलेक्ट्रिक व्हीकल्ससाठी यंदाच्या अर्थसंकल्पात खास घोषणा करण्यात आली. देशभरात सध्या इलेक्ट्रिक व्हीकल्सची मागणी सातत्यानं वाढत असल्यामुळं या वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम बॅटरीवरील कस्टम ड्यूटी अर्थात अबकारी करात सवलत देण्याची घोषणा केली.
Union Finance Minister Nirmala Sitharaman presents the Union Budget 2025: "To the list of exempted capital goods, I propose to add 35 additional capital goods for EV battery manufacturing and 28 additional capital goods for mobile phone battery manufacturing. This will boost… pic.twitter.com/9ysLAYgHDQ
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) February 1, 2025
अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळं इथून पुढं इलेक्ट्रीक वाहनांची किंमत आणखी कमी होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. देशभरात ईव्ही बॅटरीवरील कर कमी करत घरगुती बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगला वाव मिळणार आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार इलेक्ट्रॉनिक सामानांवरील अबकारी कर घटवण्याची घोषणा करण्यात आली. कोबाल्ट पावडर, लिथियम आयर्न बॅटरी वेस्ट, स्क्रॅप आणि 12 इतर महत्त्वाच्या खनिजांवर असणारा मूळ अबकारी करही पूर्णत: हटवला.