देशात 200 नवे डे केअर कॅन्सर सेंटर, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

cancer care district hospitals:  निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प 2025 मध्ये आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासंदर्भात अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 1, 2025, 12:15 PM IST
देशात 200 नवे डे केअर कॅन्सर सेंटर, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! title=
डे केअर कॅंन्सर सेंटर

cancer care district hospitals: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी नुकताच आपला आठवा अर्थसंकल्प जाहीर केला. निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प 2025 मध्ये आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासंदर्भात अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले. देशात 200 नवे डे केअर कॅंन्सर सेंटर उभारले जातील. ज्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराशी लढताना नागरिकांना चांगल्या सुविधा मिळू शकतील, असे यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या. यासोबतच एक्सीलंन्स सेंटरदेखील स्थापन केले जाणार आहेत. ज्यामुळे देशभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात नव्या संधींना चालना मिळू शकणार आहे.

स्टार्टअप्सला काय मिळालं?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्टार्टअप्ससाठी निधीची व्यवस्था सरकारच्या 10 हजार कोटी रुपयांच्या योगदानातून केली जाईल असं सांगितलं आहे. सरकार पहिल्यांदाच पाच लाख महिला, अनुसूचित जाती आणि जमाती उद्योजकांना 2 कोटींचे कर्ज देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा 

प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल, जिथे उत्पादन कमी आहे. राज्यांसह पंतप्रधान धनधान्य योजना चालवली जाणार आहे. यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास निर्मल सीतारमण यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागांच्या विकासासाठी राज्यांसह धोरण तयार करणार असंही त्यांनी सांगितलं आहे. यासह क्रेडिट लिमिट 3 लाखांवरुन 5 लाख करत शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे.

डाळींमध्ये स्वयंपूर्णतेसाठी धोरण जाहीर

तूर, उडीद आणि मसूरसाठी 6 वर्षांचे विशेष अभियान. केंद्रीय संस्था 4  वर्षांत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करतील. बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, भाज्या, फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्यांसोबत योजना आखली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 

बिहारमध्ये मखाना बोर्डाचा प्रस्ताव

बिहारमध्ये मखाना बोर्ड प्रस्तावित आहे. मखानाच्या मार्केटिंगसाठी एक बोर्ड स्थापन केला जाईल. हे मखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी केले जाईल. त्यांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठीही प्रयत्न केले जातील.