बैडएस रवि कुमार आणि लवयापा नंतर आता 'हा' दक्षिणात्य चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ट्रेलरची चर्चा

7 फ्रेबुवारी रोजी एक दक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

Updated: Feb 1, 2025, 12:17 PM IST
बैडएस रवि कुमार आणि लवयापा नंतर आता 'हा' दक्षिणात्य चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ट्रेलरची चर्चा title=

New South Movie: चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांनी दिलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट होत असतात. नुकताच अक्षय कुमार आणि शाहीद कपुर यांचा 'देवा' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या चित्रपटानंतर सुद्धा आणखी 3 चित्रपट हे 7 फ्रेबुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जुनैद खान आणि खुशी कपुर यांनी डेब्यू केलेला 'लवयापा' तसेच हिमेश रेशमियाचा बहुप्रतिक्षित 'बैडएस रवि कुमार' हे चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहत्यांमध्ये सुद्धा या चित्रपटांबद्दल प्रचंड उत्सुकताआहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त आणखी एक दक्षिणात्य चित्रपट 7 फ्रेबुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 

'तंडेल' हा दक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस 

7 फ्रेबुवारी रोजी 'तंडेल' हा दक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून बॉलिवूडचे सुपरस्टार अमिर खान या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचवेळी उपस्थित होते. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे हा चित्रपट आता चर्चेत आहे. 'तंडेल' या तमिळ भाषेतील चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्या इवेंटचे अनावरण सुपरस्टार कार्थी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अमिर खान उपस्थित होते. 

'तंडेल' हा चित्रपटाची कथा 

चंदू मोंडेटी यांनी दिग्दर्शित केलेला 'तंडेल' हा चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात श्रीकाकुलम येथील मच्छिमारांची कथा सांगितली गेली आहे. हे मच्छिमार चुकून पाकिस्तानी जलक्षेत्रात फसतात. हा सत्यकथेवर आधारित चित्रपट अल्लू अरविंद यांनी प्रस्तुत केला आहे. लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्य आणि तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री साई पल्लवी यांनी या चित्रपटातील मूख्य भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच प्रकाश बेलवाडी आणि करुणाकारक हे या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत झळकतील. 7 फ्रेबुवारी रोजी हा चित्रपट बऱ्याच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

हे ही वाचा: पुन्हा होणार कॉमेडीचा धमाका, अंकुश चौधरीच्या 'या' चित्रपटाचा येणार सिक्वेल

 

 

एक अनोखी आणि सत्य कथा 

मच्छिमारांना त्यांच्या कामाच्या दरम्यान बऱ्याच भयानर घटनांना सामोरे जावे लागते आणि याचेच चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी जलक्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांची ही अनोखी आणि सत्य कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चाहत्यांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. चाहत्यांच्या मते, साई पल्लवीचा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट असेल. तसेच, नागा चैतन्यच्या अभिनयाचे सुद्धा चाहत्यांनी कौतुक केल्याचे समोर येत आहे.