Union Budget 2025: केंद्र सरकार स्टार्टअप इकोसिस्टमला खूप पाठिंबा देत आहे. म्हणूनच यावेळीही अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीतरी खास असेल अशी अपेक्षा होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपला आठवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला असून स्टार्टअप संस्थापकांच्या काही अपेक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण केल्या आहेत, परंतु काही अपेक्षा अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप इकोसिस्टमला काय मिळाले ते जाणून घ्या
छोट्या कंपन्या आणि स्टार्टअप्ससाठी एक विशेष क्रेडिट कार्ड जारी केले जाईल, ज्याची मर्यादा 5 लाख रुपये असेल. पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केले जातील अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. एमएसएमसीची गुंतवणूक मर्यादा 2.5 पटीने वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. स्टार्टअप्ससाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर 20 कोटी रुपये असेल असंही त्यांनी सांगितलं आहे.
तसंच खेळण्यांच्या क्षेत्रासाठी एक जागतिक केंद्र निर्माण केले जाईल. कामगार केंद्रित क्षेत्रांसाठी प्रोत्साहन योजना सुरू केली जाईल. फुटवेअर लेदरसाठी एक विशेष योजना आणली जाईल. पहिल्यांदाच उद्योजकता करणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिलांना 5 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांचे मुदत कर्ज दिले जाईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे.