Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोनं गुंतवणुकीसाठी खूप चांगला पर्याय आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेतील राजकीय वातावरणातमुळं कॉमेक्सवर सोनं 2860 डॉलरच्या आसपास दिसत आहे. अशातच घरगुती वायदे बाजारात आणि सराफा बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे.
आज शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी MCXवर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. बजेट सादर करण्याआधीच 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 84,000 रुपयांवर पोहोचले आहेत. हा आत्तापर्यंतचे सर्वात विक्रमी दर आहे. आज अर्थसंकल्पात सरकार सोन्यावरील आयातशुल्क वाढवू शकतो. जर असं झालं तर सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. सरकारने मागील अर्थसंकल्पात आयात शुक्ल 15 टक्क्यांपर्यंत कमी करुन 6 टक्के केलं होतं.
आज बजेटच्या आधी 1 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 84,000 रुपयांवर गेले आहेत. कालच्या तुलनेत सोनं महागलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता आणि सोन्यातील सुरक्षित गुंतवणुक यामुळं सोन्याची मागणी वाढली आहे. त्याच कारणामुळं सोनं महागले आहे. व्याज दरात आणखी कपात झाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता अशीच असेल तर सोनं-चांदीच्या किंमती आणखी वाढू शकतात.
आज 24 कॅरेट सोनं 160 रुपयांनी महागलं असून प्रतितोळा 84,490 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोनं 150 रुपयांनी वाढलं असून 77,450 रुपयांवर स्थिरावलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोनं 120 रुपयांनी वाढ झाली असून 63,370 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 77,450 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 84,490 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 63,370रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,745 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,449 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,337 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 61,960 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 67,592 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 50,696 रुपये
22 कॅरेट- 77,450 रुपये
24 कॅरेट- 84,490 रुपये
18 कॅरेट- 63,370 रुपये