Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, क्रेडिट कार्ड लिमिट 3 लाखांहून 5 लाखांवर; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यासह क्रेडिट कार्ड लिमिट वाढवून 5 लाख करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 1, 2025, 11:35 AM IST
Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, क्रेडिट कार्ड लिमिट 3 लाखांहून 5 लाखांवर; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा title=

Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज आपला 8 वा अर्थसंकल्प सादर केला आहे. यादरम्यान त्यांनी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल, जिथे उत्पादन कमी आहे. राज्यांसह पंतप्रधान धनधान्य योजना चालवली जाणार आहे. यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास निर्मल सीतारमण यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागांच्या विकासासाठी राज्यांसह धोरण तयार करणार असंही त्यांनी सांगितलं आहे. यासह क्रेडिट लिमिट 3 लाखांवरुन 5 लाख करत शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे.

डाळींमध्ये स्वयंपूर्णतेसाठी धोरण जाहीर

तूर, उडीद आणि मसूरसाठी 6 वर्षांचे विशेष अभियान. केंद्रीय संस्था 4  वर्षांत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करतील. बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, भाज्या, फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्यांसोबत योजना आखली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 

बिहारमध्ये मखाना बोर्डाचा प्रस्ताव

बिहारमध्ये मखाना बोर्ड प्रस्तावित आहे. मखानाच्या मार्केटिंगसाठी एक बोर्ड स्थापन केला जाईल. हे मखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी केले जाईल. त्यांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठीही प्रयत्न केले जातील.