Budget 2025 : निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे! वाचा A टू Z अपडेट

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) काय काय घोषणा केल्या याबद्दल A टू Z अपडेट एका क्लिकवर पाहा. 

नेहा चौधरी | Updated: Feb 1, 2025, 12:16 PM IST
Budget 2025 : निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे! वाचा A टू Z अपडेट title=

Union Budget 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आलं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmal Sitharaman) यांनी 8 व्यांदा हे बजेट मांडलं. यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे आणि आरोग्यबद्दल महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महत्त्वाच म्हणजे निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबाबत कोणतीही घोषणा केली नाही. पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक सादर केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ नगरिकांना टॅक्समध्ये दिसाला देण्यात आलाय. आयकर फाईन करण्यासाठी मर्यादा 4 वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. मध्य वर्गासाठी मोठी घोषणा, 12 लाखांपर्यंत टॅक्स नाही. टीडीएसमधील घरभाड्याची मर्यादा वाढवण्यात आली. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मधील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूयात

अर्थसंकल्प 2025 महत्त्वाचे मुद्दे 

1  महिला आणि शेतकरी या घटकांकडे अर्थसंकल्पात विशेष लक्ष 
2 अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य 
3 पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत 
4 ग्रामीण महिला आणि तरुणांकडे विशेष लक्ष्य
5 डाळींसाठी 6 वर्षे आत्मनिर्भरता योजना लागू
6 फळं, भाजी उत्पादकांसाठी विशेष योजना 
7 बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापना, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारसाठी बोर्ड 
8 कापूर उत्पादकांवर भर देण्यासाठी नवीन योजना आणणार
 9 मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना, ५ लाख महिलांना लाभ होणार 
10 स्टार्ट अप्ससासाठी 10 कोटीवरुन 20 कोटींची क्रेडीट लिमिट 
11 चामड्याची पादत्राणं बनवण्यांसाठी विशेष योजना
12 भारताला खेळण्यांचा क्षेत्रात ग्लोबल हब बनवणार 
13 पूर्वोत्तर राज्यांत अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणार 
14 वैज्ञानिक संशोधनाला चालणा देण्यासाठी वर्षांचा कार्यक्रम 
15 भारतीय भाषांमधील पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार  
16 आयआयटींची क्षमता वाढवली, ६५०० जागा वाढवल्या
17 एआयच्या अभ्यासासाठी तीन केंद्र
18 कृषी, आरोग्य इनोव्हेशनमध्ये एआय 
19 वैद्यकीय महाविद्यालयात  पुढील ५ वर्षांत १० हजार जागा वाढवणार 
20 शहरी कामगारांचं जीवन उंचवण्यासाठी विशेष योजना 
21 प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय उभारणार, पुढील ३ वर्षात सेंटर उभारणार
22 ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांसाठी विशेष योजना 
23 जन भागीदारी योजनेतून ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी 
24 शहरी भागातल्या विकासकामांसाठी स्वंतत्र निधी, शहरांच्या विकासासाठी १० हजार कोटी 
25 जहाज निर्मिती क्षेत्राकडे विशेष लक्ष्य, अतिविशाल जहाजांचागी योजनेत समावेश
26 उडान योजना नव्याने स्थापन, पुढील १० वर्षात १२० नवी ठिकाणं जोडणार 
27 पटना विमानतळाचा विकास करणार 
28 २०२५ मध्ये आणखी ४० हजार नागरिकाचं घराचं स्वप्न पूर्ण करणार 
29 ५० नवी पर्यटक स्थळं विकसित करणार 
30 खासगी क्षेत्राला गतीशक्ती डेटा पुरवणार 
31 सोप्या पद्धतीने व्हिसा देण्याची सोय करणार 
32 पुढील ५ वर्षात १० हजार फेलिशीप

33कर्करोगाच्या सर्व औषधी पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी संबंधित ३६ औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच इतर जीवनावाश्यक औषधांच्या किंमती कमी करण्यात येणार आहे.
34 इंडिया पोस्टचे एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेत रुपांतर करण्यात येणार आहे.

35 सूक्ष्म उद्योगांसाठी MSME क्रेडिट गॅरंटी कव्हर 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाणार आहे. पुढील पाच वर्षांत 1.5 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज प्रदान केले जाईल. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करणार 

36 विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता
37 7 टॅरिफ रेट्स हटवण्यात आल्याची माहिती
38  82 गोष्टींवरून सोशल वेल्फेअर सरचार्ज हटवला असून 36 महत्त्वाची औषध कस्टम्स ड्युटीतून वगळण्यात आली आहे.
39 कॅन्सरच्या औषधांवरील आणि  मोफत वाटप होणाऱ्या औषधांवरील कस्टम्स ड्युटी  हटवण्यात आली आहे.