IND VS ENG : काय आहे कन्कशन सब्स्टीट्यूट रूल? ज्यामुळे बिघडला इंग्लंडचा खेळ, टीम इंडियाने खरंच चीटिंग केली का?

IND VS ENG 4th T20 : हर्षित राणा इंग्लंडच्या फलंदाजांवर भारी पडला, परंतु दुबेच्या जागी राणाला संघात घेतल्याने इंग्लंडकडून टीम इंडियावर आरोप करण्यात आले आहेत. 

पुजा पवार | Updated: Feb 1, 2025, 12:40 PM IST
IND VS ENG : काय आहे कन्कशन सब्स्टीट्यूट रूल? ज्यामुळे बिघडला इंग्लंडचा खेळ, टीम इंडियाने खरंच चीटिंग केली का?  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG 4th T20 : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामान्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 15 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला. परंतु या सामन्यानंतर इंग्लंडचा संघ आणि कर्णधाराकडून टीम इंडियावर बेईमानी केल्याचा आरोप लावण्यात आला. टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना शिवम दुबेच्या (Shivam Dube) हेल्मेटला बॉल लागल्यामुळे कन्कशन सब्स्टीट्यूट रूलचा वापर करून भारताने वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला दुबेची रिप्लेसमेंट म्हणून मैदानात उतरवले. त्यानंतर हाच हर्षित राणा (Harshit Rana) इंग्लंडच्या फलंदाजांवर भारी पडला, परंतु दुबेच्या जागी राणाला संघात घेतल्याने इंग्लंडकडून टीम इंडियावर (Team India) आरोप करण्यात आले आहेत. 

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने केवळ सामनाच जिंकला नाही तर ५ सामन्यांच्या सीरिजमध्ये ३-१ ने विजयी आघाडी सुद्धा घेतली. टॉस जिंकून इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. यावेळी टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 181 धावा केल्या. यात शिवम दुबेने 29, रिंकू सिंहने 30 तर शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 53 धावा केल्या. परंतु इनिंगच्या शेवटी अवघे काही बॉल शिल्लक असताना इंग्लंडच्या गोलंदाजाने मारलेला बॉल फलंदाज शिवम दुबेच्या डोक्याला लागला. यावेळी आयसीसीच्या कन्कशन सब्स्टीट्यूट रूलचा वापर करून टीम इंडियाने दुबेच्या बदल्यात गोलंदाज हर्षित राणा याला बदली खेळाडू म्हणून मैदानात पाठवले. यावेळी इंग्लंडची फलंदाजी सुरु झाली तेव्हा हर्षित राणाने 4 ओव्हरमध्ये 33 धावा देऊन 3 विकेट्स घेतले. तर रवी बिष्णोईने 3, चक्रवर्तीने 2, अर्शदीप आणि अक्षरने प्रत्येकी 1 विकेट घेऊन इंग्लडला 166 धावांवर रोखले आणि विजय मिळवला. 

हेही वाचा : धोनीचा उत्तराधिकारी असणाऱ्या ऋतुराज गायकवाडची संपत्ती किती? कार कलेक्शन पाहून तर डोळे फिरतील

 

 काय आहे कन्कशन सब्स्टीट्यूट रूल?

आयसीसीच्या नियमांनुसार जेव्हा  खेळाडू मैदानावर खेळत असतं आत्याच्या डोक्याला किंवा डोळ्याला दुखापत होते तेव्हा कन्कशन सब्स्टीट्यूट नियम लागू होतो. परंतु हा सब्स्टीट्यूट 'लाइक फॉर लाइक' असायला हवा. म्हणजेच जर कोणता वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या जागी येणार बदली खेळाडू हा वेगवान गोलंदाज असायला हवा. हा नियम आयसीसी नियमांच्या क्लॉज 1.2.7.3.4 मध्ये स्पष्ट केले आहे. टीम इंडियाने शिवम दुबे दुखापतग्रस्त झाल्यावर कन्कशन सब्स्टीट्यूट नियम वापरला. परंतु यात त्यांनी बदली खेळाडू म्हणून ऑल राउंडर खेळाडूच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला घेतले. याच गोष्टीवरून सध्या अनेक वाद निर्माण झाले आहेत. 

पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार संतापला: 

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर रागाने म्हणाला, "हा समान कंसशन सब्स्टीट्यूट पर्याय नव्हता. हे आम्हाला मान्य नाही."  इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टीम इंडियाची नाराज होत  म्हणाला, "एकतर शिवम दुबेने त्याच्या गोलंदाजीचा वेग सुमारे 25 mph ने वाढवला आहे किंवा हर्षित राणाने त्याच्या फलंदाजीत खरोखरच चांगली सुधारणा केली आहे. हा खेळाचा भाग आहे आणि आम्ही खरोखरच सामना जिंकायला हवा होता,  आम्ही निर्णयाशी असहमत आहोत."