मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या कठीण काळातून जात आहे. अभिनेत्रीच्या आईला ब्रेन ट्यूमरचं निदान झाल्याचं झालं असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती इतकी वाईट आहे की, ती कोणालाच कळत नाही. अशा परिस्थितीत राखी कधी हॉस्पिटलच्या बाहेर आदिलसोबत तर कधी तिच्या मैत्रिणीसोबत दिसते. पापाराझींसमोर हसतमुख दिसणारी राखी आता फक्त रडताना दिसते. आणि या दु:खातही तिला शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाची काळजी वाटते.
राखीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बाहेर दिसत आहे. आपल्या दुख:च्या दिवसांतही ती अभिनेत्री शाहरुख खानच्या फिल्मबद्दल बोलताना दिसली. यावेळी ती म्हणाली की, तिची आई आयसीयूमध्ये आहे, आणि म्हणूनच ती शाहरुख खानच्या पठाण गाण्यावर रील बनवू शकली नाही.
मात्र ती प्रयत्न करणार आहे की एकतरी रिल्स बनवायचा. सोबतच ती हॉस्पिटलबाहेर ती रडून आपल्या आईकडे प्रार्थना करताना म्हणाली की, शाहरुख खानच्या पठाणला आशिर्वाद दे. राखी म्हणायची, शाहरुख खानला आशीर्वाद दे की त्याचा चित्रपट सुपरहिट होवू देत.'
राखी गेलं वर्षभर चर्चेत आहे. पती रितेशसोबत लग्न आणि नंतर हे लग्न बिनसल्याच्या चर्चा. नेहमीच राखी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. आदिलचं अभिनेत्रीच्या आयुष्यात एंट्री आणि दोघंही विवाहित आहेत. सुरुवातीला आदिलने त्यांच्या नात्याला नकार दिला होता. मात्र त्यानंतरही ही जोडी एकत्र दिसली आहे. राखी आणि आदिलच्या होणाऱ्या चर्चा या निव्वळ अफवा होत्या.