Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात झाली असून पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पार पडला. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला 60 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. एवढंच नाही तर या पराभवासह पाकिस्तानी खेळाडू फखर जमांच्या दुखापतीमुळे देखील पाकिस्तान संघाचं टेन्शन वाढलंय. न्यूझीलंड विरुद्ध फलंदाजी करताना फखर जमां सलामी फलंदाजी करण्यासाठी उतरला नाही. त्याच्या ऐवजी सउद शकील ओपनिंग्ज करण्यासाठी आला. तेव्हा फखर जमांच्या दुखापतीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून भारताविरुद्ध सामन्यात तो खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहेत.
न्यूझीलंड विरुद्ध फलंदाजीनंतर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवाने फखर जमांच्या दुखापतीवर अपडेट दिली. मोहम्मद रिझवानने म्हटले की 'भारताविरुद्ध फखर जमां खेळेल कि नाही याबाबत आताच काही सांगता येत नाही. आम्हाला माहित नाही की भारताविरुद्ध सामान्यांपर्यंत तो ठीक होईल की नाही'. RevSportz ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार भारताविरुद्ध सामन्यातून फखर जमां हा बाहेर पडला आहे. परंतु अद्याप पाकिस्तानने याबाबत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. फखर जमां जर भारत विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला तर पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ ए ग्रुपमध्ये आहेत. याशिवाय यात बांगलादेश आणि न्यूझीलंडचा सुद्धा समावेश आहे. प्रत्येक संघ ग्रुप सतेजमध्ये प्रत्येकी ३ सामने खेळतील. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होणार आहे. दुपारी २:३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरो चा असणार असून जर पाकिस्तान भारताविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाला तर ते टूर्नामेंटमधून बाहेर पडतील.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हे सामानाने स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवले जातील. तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पारपडेल.