Hema Malini Rakhi Sawant Controversy: हेमा मालिनी आणि राखी सावंत या बॉलिवूड तारका निवडणुकीच्या मुद्द्यावरून आमनेसामने आल्या आहेत. कंगना रणौत मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत हेमा मालिनी यांना विचारलं असता त्यांनी राखी सावंत हिचा उल्लेख करत टोला लगावला होता. "तुम्हाला फक्त मथुरेत फिल्म स्टारचीच गरज आहे. उद्या राखी सावंतलाही पाठवाल," असं हेमा मालिनी यांनी म्हटलं होतं. आता राखी सावंत हीने आपल्या अंदाजात प्रत्युत्तर दिलं आहे.
राखी सावंत हीने प्रत्युत्तरात सांगितलं की, "मोदीजी समाजाची जबाबदारी माझ्या खांद्यावर देत आहेत याबद्दल मी खूप आभारी आहे. मी लहानपणापासून समाजसेवा करत आहे. धन्यवाद मोदीजी, तुम्ही मला पात्र मानले. यावेळी ते मला निवडणुकीत उतरवत आहेत. हेमा मालिनी यांनी यापूर्वीच याची घोषणा केली आहे. माझा जन्म देशसेवेसाठी झाला आहे. मला देशाची सेवा करायची आहे. चहा बनवता बनवता आमचे मोदी पंतप्रधान होऊ शकतात, मग मी बॉलिवूडमध्ये काम करताना निवडणूक का लढवू शकत नाही? मला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. 2024 मध्ये तुम्हाला मी निवडणूक लढवताना दिसेल."
#WATCH मैं शुक्रगुजार हूं कि PM मुझे ये ज़िम्मेदारी देना चाहते हैं और इस बार मुझे चुनाव में खड़ा कर रहे हैं और इसका ऐलान हेमा मालिनी जी ने कर ही दिया है। मैं देश की सेवा के लिए ही पैदा हुई हूं और देश की सेवा ही करना चाहती हूं: BJP सांसद हेमा मालिनी के बयान पर अभिनेत्री राखी सावंत https://t.co/QekVvqR1xP pic.twitter.com/HmsEAY3nRi
— ANI_HindiNews (@AHindinews) September 25, 2022
हेमा मालिनी यांनी मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दोनदा निवडणूक जिंकली आहे. 2014 मध्ये त्यांनी प्रथमच येथून आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांचा पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आरएलडीच्या कुंवर नरेंद्र सिंह यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.