SS Rajamouli Assassination: प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली (RRR Director SS Rajamouli) यांच्या हत्येचा कट (Assasination) रचण्यात आल्याचा धक्कादायक दावा रामगोपाल वर्मा (Ramgopal Varma) यांनी केला आहे. रामगोपाल वर्मा यांनी काही ट्विट केले असून यामध्ये त्यांनी राजामौली यांची हत्या करण्यासाठी काही दिग्दर्शक एकत्र आले असून त्यात आपलाही सहभाग असल्याचा दावा केला आहे. तसंच त्यांनी राजामौली यांना आपली सुरक्षा वाढवण्याचं आवाहन केलं आहे. राजामौली यांचं कौतुक करताना त्यांनी के आसिफ, रमेश सिप्पी, करण जोहर, भन्साळी यांनाही प्रसिद्धीत मागे टाकल्याचं म्हटलं आहे.
रामगोपाल वर्मा यांनी 23 जानेवारीला ट्वीट केलं असून यामध्ये त्यांनी आपण मद्यधुंद अवस्थेत असल्याची कबुली दिली आहे. ते म्हणालेत की "राजामौली तुम्ही 'मुघल-ए-आजम' बनवणाऱ्या के आसिफ यांच्यापासून ते 'शोले' बनवणारे रमेश सिप्पी यांच्यासह आदित्य चोप्रा, करण जोहर आणि संजय लीला भन्साळी या सर्वांना प्रसिद्धीत मागे टाकलं आहे".
Hey @ssrajamouli U basically SURPASSED every film maker from #KaAsif who made #MughaleAzam till #RameshSippy who made #Sholay and also the likes of Aditya Chopras, Karan Johars and the bhansalis of India and I want to suck ur little toe for that https://t.co/KCgN0u2eJa
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 23, 2023
यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी राजामौली यांना काही दिग्दर्शक तुमच्या हत्येचा कट आखत असल्याचं सांगत आपली सुरक्षा वाढवण्याचं आवाहन केलं आहे. "राजामौली सर, कृपया तुमची सुरक्षा वाढवा. तुमचा द्वेष करणारे काही दिग्दर्शक एकत्र आले असून हत्येचा कट आखत आहेत. मीदेखील त्याचा भाग आहे. मी चार ग्लास डाऊन असल्याने हे गुपित उघड करत आहे".
And sir @ssrajamouli , please increase ur security because there is a bunch of film makers in india who out of pure jealousy formed an assassination squad to kill you , of which I am also a part ..Am just spilling out the secret because I am 4 drinks down
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 23, 2023
रामगोपाल वर्मा यांनी ट्विटरला राजामौली आणि जेम्स कॅमरॉन यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडीओही शेअर केला आहे. एखाद्या भारतीय दिग्दर्शकाला इतक्या मोठ्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल असा विचारही कोणी केली नव्हता असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.