42 किलो वजन कमी करुन 51 वर्षीय राम कपूरचं इंस्टाग्रामवर कमबॅक, फोटो पाहून चाहते स्तब्ध

राम कपूर हा अभिनेता वयाच्या 51 व्या वर्षी वेट लॉसमुळे चच्रेत आला आहे. मालिकेत राम कपूर यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडल्या पण आता त्याच ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यांना थक्क करणार आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 20, 2024, 02:53 PM IST
42 किलो वजन कमी करुन 51 वर्षीय राम कपूरचं इंस्टाग्रामवर कमबॅक, फोटो पाहून चाहते स्तब्ध  title=

2006 मध्ये प्रदर्शित झालेली 'कसम से' ही मालिका टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यामध्ये जय वालिया आणि बानी या पात्रांना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. या भूमिका साकारणारे अभिनेते राम कपूर आणि प्राची देसाई हे केवळ टीव्हीच नव्हे तर बॉलीवूड जगतातही प्रसिद्ध नाव आहेत. 18 वर्षात या दोन स्टार्सच्या लूकमध्ये बरेच बदल झाले आहेत. प्राची देसाई तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे, तर राम कपूर यांच्या आताच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम पोस्टने चाहत्यांना थक्क केलं आहे. 

51 वर्षीय राम कपूर यांनी 42 किलो वजन कमी करुन फिट झाले आहेत. याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होताच चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor)

गेल्या अनेक आठवड्यांपासून अभिनेता राम कपूर इंस्टाग्रामवरून गायब होते. पण काही तासांपूर्वी शेअर केलेल्या दोन पोस्ट्सने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. पहिल्या पोस्टमध्ये, रामने एक मिरर सेल्फी शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने भरपूर वजन कमी केल्याचं अधोरेखित होत आहे. यामध्ये राम काळ्या रंगाची पँट आणि टी-शर्टमध्ये दिसत आहे. त्यासोबत त्याने लिहिले, नमस्कार मित्रांनो, इंस्टावर बरेच दिवस नसल्यामुळे क्षमस्व...  मी स्वतःवर खूप काम करत होतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor)

'कसम से' व्यतिरिक्त राम कपूर 'बडे अच्छे लगते हैं' सारख्या मालिकांसाठी देखील ओळखला जातो. याशिवाय तो 'कुछ कुछ लोचा है', 'युद्ध', 'हमशकल' आणि 'करले तू भी मोहब्बत'साठीही ओळखला जातो.

वजन कमी करण्यासाठी काय कराल? 

वजन कमी करण्यासाठी सर्वात अगोद तुमचा डाएट अतिशय महत्त्वाचा असतो. आपल्या आहारात कॅलरीज आणि पोषकतत्त्वांनी समृद्ध आहार असणे गरजेचे. 
वजन कमी करण्यासाठी योगासने आणि प्राणायाम नियमित करावा.
यासाठी तुम्ही तणाव कमी करा आणि पुरेसे पाणी प्या.
वजन कमी करण्यासाठी, दिवसातून किमान 6 ते 8 तास झोप घ्या.
यासाठी सतत व्यायामाचा सराव करावा.