कपूर आणि भट्ट कुटुंब एकाचं फ्रेममध्ये, आलिया-रणबीरचा पहिला Family Photo

आलिया भट्ट-रणबीर कपूर पहिल्यांदा कुटुंबासोबत पती-पत्नीच्या रूपात... पाहा फोटो  

Updated: Apr 16, 2022, 11:13 AM IST
कपूर आणि भट्ट कुटुंब एकाचं फ्रेममध्ये, आलिया-रणबीरचा पहिला Family Photo

मुंबई : लग्न फक्त मुलगा आणि मुलीचं नसतं तर, दोन कुटुंबाचं असतं.. असं आपण कायम ऐकतो... याचं वाक्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री आलिया आणि अभिनेता रणबीरच्या लग्नानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबाचा Family Photo. आलिया आणि रणबीरचं लग्न झाल्यानंतर दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण कपूर आणि भट्ट कुटुंबाला एकाचं फ्रेममध्ये पाहून चाहत्यांना देखील प्रचंड आनंद झाला आहे. सध्या त्यांचा Family Photo सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

फोटोमध्ये आलिया आणि रणबीर सोबत सोनी राजदान, महेश भट्ट, पूजा  भट्ट, नितू कपूर, रिद्धिमा कपूर आणि पती भरत साहनी दिसत आहेत. नितू यांनी Family Photo शेअर करत कॅप्शनमध्ये, 'माझं कुटुंब...' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

दरम्यान एका व्हिडीओमध्ये नितू कपूर आलियाचं कौतुक करताना दिसल्या. मेहंदी समारंभानंतर नीतू कपूर बाहेर स्पॉट होताच. पापाराझींनी त्यांना प्रश्न विचारले. तर दुसरीकडे, नीतू कपूरने तिच्या या उत्तराने तुमचंही मन प्रसन्न होईल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नीतू कपूर फंक्शनमधून बाहेर पडताच पापाराझींनी त्यांना आलियाबद्दल विचारलं, त्या म्हणाल्या की मी काय बोलू याबद्दल आलिया बेस्ट आहे. त्याचवेळी जवळ उभी असलेली आलियाची वहिनी म्हणजेच रिद्धिमा कपूर ती डॉल आहे.. त्यांचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.