ही उर्फी आहे तरी कोण... लखनऊ ते मुंबई 'असा' केला तिने प्रवास

उर्फीची फॅशन डिझायनर नक्की आहे तरी कोण? 

Updated: Jul 17, 2022, 10:37 PM IST
ही उर्फी आहे तरी कोण... लखनऊ ते मुंबई 'असा' केला तिने प्रवास title=

मुंबईः सध्या उर्फी जावेद ही सोशल मीडिया स्टार असून तिच्या लुकच्या सगळीकडेच चर्चा असतात. उर्फीची फॅशन डिझायनर नक्की आहे तरी कोण? आणि तिला असे कपडे घालण्याचा कॉन्फिडन्स येतो कुठून...? हाही एक वादाचा मुद्दा. पण त्याही पेक्षा ही उर्फी नक्की आली तरी कुठून? याची कल्पनाच कोणाला नसून सध्या सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की नक्की ही उर्फी जावेद आली तरी कुठून आणि कशी.. ? आणि यापुर्वी तिने नक्की काय काम केले आहे?

'तेधी-मेधी फॅमिली' या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिला सुरूवातीपासूनच अभिनयाची आवड आहे. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुंबईत आली, असं तिनेच एका मुलाखतीच्या वेळी सांगितले आहे.

उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. कधी ती तिच्या बिकिनी स्टाइलमुळे, कधी बॅकलेस ड्रेसमुळे तर कधी तिच्या रेझर ड्रेसमुळे चर्चेत असते. उर्फीच्या विचित्र फॅशन सेन्सचीही बरीच चर्चा आहे.

16 ऑक्टोबर 1996 रोजी नवाबांचे शहरअसलेल्या लखनऊ येथे जन्मलेल्या उर्फी जावेदबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की ग्लॅमरच्या जगात येण्यापूर्वी तिने दिल्लीस्थित कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम केले होते. शिक्षणानंतर तिने दिल्लीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता पण नंतर करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली.

उर्फी जावेदला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभ्यासातही ती खूप चांगली स्टूडंट आहे. उर्फीने लखनऊमधूनच पब्लिक रिलेशन्स आणि कम्यूनिकेशनचा कोर्स केला आहे. उर्फी जावेदचे इंस्टाग्रामवर 3.3 million फॉलोवर्स आहेत.