मुंबई : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे दाक्षिण्य सिनेमांमध्ये रिमेक बनवण्यात आले आहेत. यामध्ये 'सिंघम', 'राउडी राठौर', 'रेड्डी', 'भूल भुलैया', 'वॉन्टेड' या चित्रपटांचा समावेश झाला.
काही दिवसांपूर्वी युट्युबवर 'गोपाला गोपाला' नावाचा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट अक्षय कुमार, परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा रिमेक आहे. तेलगू भाषेमध्ये हा चित्रपट बनवला आहे. सिनेमाघरांप्रमाणेच गोल्डमाईन्स मुव्हीजद्वारा हा युब्ट्युबवरही रिलीज करण्यात आला आहे.
'ओ माय गॉड' हा चित्रपट अनेकदा पाहिला असला तरीही त्याचा रिमेक तितकाच खास आहे. साऊथ सुपरस्टार वेंकटेश डग्गुबती या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे.
'गोपाला गोपाला' तेलगूमध्ये बनवण्यात आला असला तरीही त्याचे हिंदी व्हर्जन युट्युबवर ट्रेंड होत आहे. हिंदी आणि तेलगू अशा दोन्ही सिनेमांमध्ये अभिनेता मिथुन चक्रवर्ती त्याच भूमिकेत दिसणार आहे. आत्तापर्यंत 37 लाखाहून अधिक लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे.
2012 साली परेश रावल आणि अक्षय कुमार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होते. अक्षय कुमार कृष्णाच्या तर परेश रावल व्यापारी कांजीलाल मेहतांच्या भूमिकेत दिसले होते. त्यांचा देवावर विश्वास नव्हता.