सलमान खानच्या गाण्याचं शूटिंग सुरु असतानाच पोलिसांनी सगळ्यांना अटक केली अन्..; अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा

Salman Khan Hum Saath Saath Hain case : 'हम साथ साथ है' मधील अभिनेत्यानंच सलमान खान आणि इतर कलाकारांच्या अटकेविषयी सांगितला संपूर्ण किस्सा

दिक्षा पाटील | Updated: Apr 1, 2024, 03:25 PM IST
सलमान खानच्या गाण्याचं शूटिंग सुरु असतानाच पोलिसांनी सगळ्यांना अटक केली अन्..; अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा title=
(Photo Credit : Social Media)

Hum Saath Saath Hain Salman's Arrest : 1999 मध्ये प्रदर्शित झालेला 'हम साथ साथ है' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आजही प्रेक्षक आनंदानं हा चित्रपट पाहताना दिसतात. याच चित्रपटा दरम्यान, सलमान खानला काळवीटाची शिकार प्रकरणी अटक करण्यात आली होती. तर त्याच प्रकरणात काही वर्षांपूर्वी त्याची सुटका देखील झाली होती. मात्र, जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हा सेटवर नक्की कसं वातावरण होतं आणि काय झालं होतं. या केसचा शूटिंगवर काही परिणाम झाला होता का या सगळ्याचा खुलासा अभिनेता मगेश ठाकुर यांनी केला आहे. 

खरंतर, सलमान खानसोबतच चित्रपटातील इतर कलाकारांच्या विरोधात काळवीटाची शिकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. आता या संपूर्ण प्रकरणाला इतक्या वर्षांनंतर आठवत महेश ठाकूर यांनी अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. महेश ठाकुर यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. महेश ठाकूर यांच्या चित्रपटातील भूमिकेविषयी बोलायचे झाले तर त्यांनी सलमानच्या मेहूण्याची भूमिका साकारली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत महेश यांनी म्हटलं की "आम्ही जोधपूरमध्ये शूट करत होतो. मात्र, मध्येच शूटिंग थांबवली आणि त्यावेळी आम्ही चित्रपटातील एका गाण्याचं शूटिंग करत होतो, तेव्हा अचानक सेटवर पोलिस आले आणि त्यांनी संपूर्ण कास्टला अटक केली. तब्बू, सलमान खान, सैफ अली खान, नीलम कोठारी, सोनाली बेंद्रे सगळ्यांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. मला, करिश्मा कपूर आणि मनीषला सोडलं. पोलिसांनी मुलींना काही काळात सोडलं पण सलमान खानला संपूर्ण रात्र तुरुंगात रहावं लागलं. तर दुसऱ्या दिवशी त्याचे दोघे भाऊ अरबाज आणि सोहेल त्याची सुटका करण्यासाठी आले होते."

पुढे महेश यांना विचारण्यात आलं की "जेव्हा सलमान सेटवर परल आला तेव्हा तो ठीक होता का?" त्यावर उत्तर देत महेश म्हणाले, "हो, सलमान कूल डूड आहे. सैफ पण नॉर्मल होता. ते नॉर्मल होता. पण आमच्या सगळ्यांसाठी हा चांगला अनुभव नव्हता. पण आता ही गोष्ट संपली ही एक चांगली गोष्ट आहे."

हेही वाचा : सहकलाकाराच्या पत्नीसोबत मस्करी करणं अजय देवगणला पडलेलं महागात, तिनं केलेला आत्महत्येचा प्रयत्न

महेश यांनी पुढे सांगितलं की "त्यावेळी कोणतीही माहिती ही स्पष्ट नव्हती, अशात न्यूजमध्ये खूप चर्चा झाली. त्यांना नसल्याचं होतं केलं. खरंतर त्यांनी नकारात्मकता पसरवली होती. पण शेवटी काही निघालं नाही. "