घटस्फोटानंतर Samantha ruth prabhu सासऱ्यांच्या 'त्या' गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत

सिनेविश्वातील सुंदर अभिनेत्री तब्बू नेहमीच तिच्या एकाहून एक अशा जबरदस्त चित्रपटांमुळे चर्चेत असते. 

Updated: Nov 4, 2021, 05:09 PM IST
घटस्फोटानंतर Samantha ruth prabhu सासऱ्यांच्या 'त्या' गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत  title=

मुंबई : सिनेविश्वातील सुंदर अभिनेत्री तब्बू नेहमीच तिच्या एकाहून एक अशा जबरदस्त चित्रपटांमुळे चर्चेत असते. त्याचबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चाही रंगताना दिसतात. ती अनेकदा तिच्या नात्यामुळे चर्चेत असते. बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त, ती साऊथ स्टार नागार्जुनसोबतही रिलेशनशिपमध्ये होती, ती त्याच्यासोबत 15 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती, पण अद्याप तिला खरे प्रेम मिळालेले नाही.

साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू नागा चैतन्यसोबत घटस्फोटा घेतल्यामुळे ही सोशल मीडियावर खूप चर्चेत होती. त्यानंतर आता सामंथा रुथ प्रभूचे माजी सासरे म्हणजेच नागार्जुन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  सुरुवातीला नागार्जुन आणि तब्बू यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली आहे. दोघेही खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांच्या प्रेमाला यश आले नाही. तब्बू आणि नागार्जुन यांची पहिली भेट 'निन्ने पेल्लादता' चित्रपटादरम्यान झाली होती.

आज तब्बूच्या वाढदिवसानिमित्त तिच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यात नागार्जुन आणि तब्बूचं नातं देखील आहे. असे म्हटले जाते की, तब्बू जेव्हा नागार्जुनच्या प्रेमात पडली तेव्हा अभिनेता विवाहित होता आणि त्याच्या पत्नीला या सर्व गोष्टींची कल्पना नव्हती.

 साउथ एक्ट्रेस सामंथा रुथ प्रभु के एक्स ससुर यानी नागार्जुन और तब्बू के रिश्ते के चर्चे खूब रहे हैं. दोनों लंबे समय तक रिलेशनशिप में रह चुके हैं, लेकिन इनका प्यार सफल नहीं हो पाया है. तब्बू और नागार्जुन (Tabu And Nagarjuna) की पहली मुलाकात फिल्म 'Ninne Pelladata' के दौरान हुई थी.

दोन्ही स्टार्स एकमेकांच्या इतके प्रेमात होते की तब्बू त्यांना भेटण्यासाठी हैदराबादला जात असे, एवढेच नाही तर अभिनेत्रीने तिथे घरही विकत घेतले. तब्बूने नागार्जुनवर बिनशर्त प्रेम केले असेल, पण अभिनेत्याला कधीही आपल्या पत्नीला सोडायचे नव्हते. हे एक कारण होते की, अभिनेत्रीने स्वतःला त्याच्यापासून दूर केले होते. 2012 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते.