मुंबई : बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघेही पुन्हा करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून आलिया आणि धवनच्या सिनेमाची चर्चा होती. त्यावेळी अशी बातमी आली होती की या सिनेमाचे नाव शिद्दत असे असेल. मात्र करण जोहरने काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन या सिनेमाचे नाव शिद्दत नसल्याचे स्पष्ट केले होते. या सिनेमात आलिया-वरुणसह माधुरी दीक्षितही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
आलियाने ट्विटर हँडलवरुन या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज केलेय. आलिया आणि वरुणच्या या सिनेमाचे नाव कलंक आहे. या सिनेमात आलिया, वरुण आणि माधुरीशिवाय संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाचे नाव कलंक असून हा सिनेमा ७०-८०च्या दशकातील सिनेमाची आठवण करुन देतो. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन करणार आहेत. याआधी आलिया आणि अर्जुन कपूर यांच्या २ स्टेटस या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केलेय.
KALANK- an EPIC DRAMA! So so sooo excited to be working with these phenomenal beautiful actors!!! Directed by my dearest friend #AbhishekVarman Next year.. here we come.. @MadhuriDixit @Varun_dvn @sonakshisinha @duttsanjay #AdityaRoyKapoor pic.twitter.com/nyuRWy2hFd
— Alia Bhatt (@aliaa08) April 18, 2018
करण जोहर आणि त्याच्या वडिलांनी हा सिनेमा बनवण्याचे १५ वर्षांपूर्वी ठरवले होते. अखेर १५ वर्षानंतर या सिनेमावर काम सुरु झालेय हा सिनेमा पुढील वर्षी १९ एप्रिलला रिलीज होणार आहे.
More on #Kalank...
The film, which was planned 15 years ago by Karan and his dad Yash Johar, will finally be made in 2018...
Story is set in 1940s...
On 18 April 2014, #2States had released. On 18 April 2018, #Kalank begins its journey...#Kalank to release on 19 April 2019. pic.twitter.com/hmlhxetpYx— taran adarsh (@taran_adarsh) April 18, 2018
वरुण आणि आलियाचा हा एकत्र चौथा सिनेमा आहे. दोघांनी स्टुडंट ऑफ दी इयर, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, बद्रीनाथ की दुल्हनिया सारख्या सिनेमात एकत्र काम केले होते. कलंक या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे खूप वर्षानंतर माधुरी दीक्षित आणि संजय दत्तची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. हे दोघेही सज्जन, खलनायक आणि थानेदारसारख्या सिनेमात एकत्र दिसले होते.