ओळखलात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला?

सोशल मीडिया एक असं माध्यम आहे. ज्याच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या मनातल्या भावना प्रकट करत असतो.

Updated: Jan 12, 2020, 04:07 PM IST
ओळखलात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला?  title=

मुंबई : सोशल मीडिया एक असं माध्यम आहे. ज्याच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या मनातल्या भावना प्रकट करत असतो. शिवाय जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं हे एकमेव ठिकाण आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर आपल्या रोजच्या जीवनात करत असतो. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेला हा फोटो नक्की कोणत्या अभिनेत्रीचा आहे? असा प्रश्न उपस्थित आहे. तर हा फोटो अभिनेता सैफ अली खानची लाडकी मुलगी अभिनेत्री सारा अली खानचा आहे. या फोटोमध्ये सारा फार क्यूट दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या गोंडस लूकची चर्चा होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

हा फोटो खुद्द साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. नुकताच सारा सुट्ट्यांचा आनंद घेवून भारतात परतली आहे. दरम्यान तिने बिकनीमध्ये फोटो पोस्ट केले होते. तेव्हा नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. 

सारा लवकरच 'लव आज काल २' आणि 'कुली नं. १' चित्रपटात झळकणार नाही. 'लव आज काल २' चित्रपटाच्या माध्यमातून ती आणि अभिनेत्री कार्तिक आर्यन एकत्र झळकणार आहेत. चित्रपट त्याचप्रमाणे त्यांच्या नात्याच्या चर्चा देखील चांगल्याच जोर धरत आहे. 

तर दुसरीकडे, 'कुली नं. १' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सारा अभिनेता वरूण धवणसोबत झळकणार आहे. 'कुली नंबर १' चित्रपटाच्या माध्यमातून हे दोन कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. तब्बल २४ वर्षांनंतर 'कुली नंबर १' मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.