मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe). अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारणारे शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर ते नेहमीत त्यांत मतं मांडताना दिसतात. नुकतंच शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शरद पोंक्षे समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नात्याबाबत बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
शरद पोंक्षे यांनी त्यांचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय? याविषयी बोलताना शरद पोंक्षे, म्हणाले 'एक चित्र बघत आपली पिढी मोठी झाली. ते चित्र म्हणजे एक लंगोट नेसलेला, दाढी वाढलेली, खडकावर रुबाबामध्ये राजासारखा बसलेला व्यक्ती आणि त्यांच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत. छत्रपती पदावर बसलेले आहेत, राज्याभिषेक झालेला आहे, स्वराज्याची निर्मिती देखील झाली आहे, राजा म्हणून राज्याभिषेक संपूर्ण देशानं मान्य केलं आहे आणि ते विनम्रपणे मान खाली घालून शांतपणे बाजूला उभे आहेत.'
पुढे शरद पोंक्षे म्हणाले, 'दाढी वाढलेले, खडकावर बसलेले सन्यासी म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या बाजूला उभे असलेले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दोघे ही महान का? कारण खरा राजा तोच असतो ज्यांना आपल्या भूमीतील संतांचा आदर कसा करायचा हे कळतं.' (sharad ponkshe on samarth ramdas swami and chhatrapati shivaji maharaj relation viral video)
शरद पोंझे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी म्हणाला, दंडवर. दुसरा नेटकरी म्हणाला, सुंदर माहिती दिली, अशा अनेक कमेंट केल्या आहेत. (Trending Video)