मुंबई : संजय लीला भंसाळी यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ' पद्मावती' येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.
जसजशी प्रदर्शनाची वेळ जवळ येतेय तसा या चित्रपटाला विरोधही तीव्र होतोय. समाजातील काही स्तरातून या चित्रपटाला विरोध होतोय.
पद्मावतीच्या वादामध्ये आता शशी थरूर यांनी उडी घेतली आहे. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी या वादात राजस्थानी महिलांची स्थितीवर लक्ष देण्याची गरज आहे. 'घुंघट' पेक्षा शिक्षण महत्त्वाचे आहे असा सल्ला दिला आहे.
Agree totally. The #Padmavati controversy is an opportunity to focus on the conditions of Rajasthani women today ¬ just of queens six centuries ago. Rajasthan’s female literacy among lowest. Education more important thang Hoog hats https://t.co/82rvGmkfwO
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 13, 2017
राजस्थानमध्ये साक्षतेचे प्रमाण कमी आहे. प्रामुख्याने येथील महिला घरात राहतात. त्यामुळे येथील सामाजिक स्थिती पाहता महाराणींपेक्षा महिलांनी शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे.
पद्मावती चित्रपटाला प्रामुख्याने राजपूत संघटनांकडून विरोध होतोय. त्यांच्यामते चित्रपट निर्मात्यांनी राणी पद्मावतीच्या इतिहासाचं चूकीच चित्रण करण्यात आलं आहे.
संजय लीला भंसाळी यांनी या आरोपाला फेटाळून लावले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेदेखील या चित्रपटाच्या रिलीजला रोखणं टाळले आहे.