मुंबई : अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तरने 19 फ्रेब्रुवारी रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरूवात केली. शिबानी आणि फरहान 2018 सालपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी आपण रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती कधीही लपवली नाही. त्यांनी प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिली. सोशल मीडियावर दोघे एकमेकांसोबत फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसले. त्यांचे फोटो देखील कायम चर्चेत राहिले.
पण आता शिबानी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. लग्नानंतर शिबानीने सोशल मीडियावरील स्वतःच्या नावात बदल केला आहे. लग्नाआधी सोशल मीडियावर तिचं नाव शिबानी दांडेकर असं होतं.
लग्नानंतर शिबानीने स्वतःच्या नावात बदल केला आहे. तिने सोशल मीडियावर शिबानी दांडेकर-अख्तर असं नाव लिहिलं आहे. एवढंच नाही तर तिने मिसेस अख्तर देखील लिहिलं आहे.
शिबानी सध्या लग्नानंतर बदलेल्या नावामुळे चर्चेत आहे. शिबानी आणि फरहानने अगदी साध्या पद्धतीत लग्न केलं. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता ठराविक पाहुण्याच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं.