Bollywood Actress : (Shradha walkar case) श्रद्धा वालकर प्रकरणाला दर दिवशी नवे फाटे फुटत असतानाच आता बॉलिवूडमधून (Bollywood) अशा एका नात्यावरून पुन्हा एकदा पडदा उचलला गेला आहे जो पाहता अनेकांना धक्का बसत आहे. हे प्रकरण आहे, 'स्त्री' (stree) फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी आणि तिच्या Ex Boyfriend चं. हिंदीच नव्हे, तर विविधभाषी कलाजगतांमध्ये तितक्याच सराईतपणे वावरणाऱ्या फ्लोराला अशा कोणत्याही प्रसंगाचा सामना करावा लागला असेल याची कोणालाही कल्पना नव्हती. पण, तिच्यावर तो वाईट प्रसंग ओढावला होता हीच वस्तुस्थिती.
जिथं फ्लोराला आपल्या कामाचा प्रचंड अभिमान आहे, तिथेच भूतकाळात घडलेल्या काही घटनांमधून मात्र ती स्वत:ला आजही सावरू शकलेली नाही. हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिनं प्रियकर गौरांग दोषी याच्यासोबतच्या नात्यावरून पुन्हा एकदा पडदा उचलला. (relationship )
'मी आईसोबत मुंबईत राहत होते. पण, मी स्वत:चं घर सोडलं होतं. कारण त्यावेळी मी त्याच्या (प्रियकराप्रती)वर असणारं प्रेम सिद्ध करावं अशी त्याची इच्छा होती. आईनं सांगूनही मी तिचं न ऐकता राहतं घर सोडलं होतं', असं सांगताना त्या मुलानं सुरुवातीला इतका चांगुलपणा दाखवला की त्याची भुरळ अगदी सहजपणे माझ्या आई- वडिलांनाही जाळ्यात अडकवलं होतं असंही तिनं सांगितलं. श्रद्धा वालकरसोबतही आपल्यासारखाच प्रकार झाला. ज्याच्यासाठी मी घर सोडलं, त्यानं एका आठवड्याभरातच मारहाणीस सुरुवात केली होती. पण, तो एकाएकी इतका का बदलला हेच कळत नव्हतं, असं म्हणताना फ्लोराला ते दिवस आठवतानाही त्रास होत होता. (shocking Bollywood Actres Flora Saini boyfriend once beaten her brutally )
फ्लोरा परिस्थितीपुढे हतबल होती, प्रियकरानं आई- वडिलांसह तिलाही मारण्याची धमकी दिली. मारहाणीचं प्रमाण सातत्यान वाढत चाललं होतं. फ्लोरा एका अशा नात्यात अडकली होती ज्यातून बाहेर निघण्यासाठीचा आत्मविश्वास एकवटणंही तिला कठीण होऊन बसलं होतं. एके दिवशी कहर झाला. रात्रीची वेळ होती आणि प्रियकरानं फ्लोराला इतकं मारलं की तिचा जबडा तुटला.
स्वत:च्याच वडिलांचा फोटो हातात घेऊन त्यांची शपथ घेत आज मी तुला संपवणार असल्याच्या आवेगात तो फ्लोराशी बोलू लागला होता. तो फोटो ठेवण्यासाठी जेव्हा मागे वळला तेव्हा मात्र फ्लोराला तिच्या आईचे शब्द आठवले, 'जेव्हा पळ काढायचाय तेव्हा निघ... अंगावर कपडे आहेत की नाही याचा विचारही करु नकोस, पैसे आहेत की नाहीत हे मनात आणू नको , फक्त तिथून पळ'. आईचे हे शब्द तिला बळ देऊन गेले आणि तिनं तिथून काढता पाय घेतला आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी फ्लोरानं कुटुंबीयांसह पोलीस स्थानक गाठलं. तिथंही काही अडचणींचा सामना तिला करावा लागला होता.
आपल्यासोबत घडलेल्या या प्रसंगातून फ्लोरानं अनेक मुलींना हा संदेश दिला की त्यांना या नकारात्मक नात्यांची ओळख वेळीच पटली पाहिजे. कारण ही नाती तुम्हाला मित्र, कुटुंब या साऱ्यांपासून दूर करतात. तुमचं खच्चीकरण करून, स्वाभिमान पायदळी तुडवतात. आपल्यासोबत घडलेला प्रसंग कोणावरही ओढावू नये अशीच इच्छा तिनं व्यक्त केली.