मुंबई पोलिसांना बदनाम करून सोडणारी प्रकरणं! लखन भैय्या, ख्वाजा युनूस कोण होते? त्यांचं काय झालं?

Mumbai Police Crime Branch : अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. मुंबई पोलिसांवर पहिल्यांदाच अशी वेळ आली नाही. तर लखन भैय्या, ख्वाजा युनूस आजही या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांना बदनाम करुन सोडलंय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 20, 2025, 05:35 PM IST
मुंबई पोलिसांना बदनाम करून सोडणारी प्रकरणं! लखन भैय्या, ख्वाजा युनूस कोण होते? त्यांचं काय झालं? title=

Mumbai Police Crime Branch : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू पोलीस एन्काऊंटरमध्ये झाला होता. या प्रकरणात आज कोर्टात अहवाल सादर करण्यात आला. ज्यामुळे मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होतोय.  बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत, असे फॉरेन्सिक अहवालात म्हटलंय. अक्षयच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या 5 पोलीस अधिकाऱ्यांवर. कायद्यानुसार योग्य ती कारवाई करा, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली. 
त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस बदनाम झालंय. पण मुंबई पोलीस बदनाम होण्याची ही पहिलच वेळ नाही. यापूर्वी लखन भैय्या, ख्वाजा युनूस एन्काऊंटरमुळे मुंबई पोलीस पहिलेच बदनाम आहे. काय आहे लखन भैय्या आणि ख्वाजा यूनुस प्रकरण पाहूयात. 

ख्वाजा युनूस कथित कोठडी मृत्यू प्रकरण!

2 डिसेंबर 2002 मध्ये घाटकोपरमध्ये बसमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. यात दोघांचा मृत्यू तर 39 लोक जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. 27 वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा राहणारा होता. तो व्यवसायाने इंजीनियर होता. दुबईत काम करत होता. 25 डिसेंबर 2002 रोजी या बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्यावर दहशतवाद प्रतिबंधक कायदा (पोटा)ही लागू करण्यात आला होता. 6 जानेवारी 2003 मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेण्यात येत होते. त्यावेळी तो फरार झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता.

कोर्टाने युनूस प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात युनूसचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं उघड झालं होतं. युनूसला तुरुंगात नग्न करुन पट्ट्यांनी बेदम मारहाण केल्याचं एका साक्षीदाराने कोर्टाला सांगितलं होतं. त्याचा तोंडातून आणि नाकातून रक्त येत होतं. त्या नंतर तो गायब झाला होता. 

मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंब चिंतेत होते. त्यामुळे नाराज कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उच्च न्यायालयाने हे प्रकरण महाराष्ट्र सीआयडीकडे तपासासाठी सोपवले. यात हा सर्व प्रकार उघड झाला. या प्रकरणी एकूण 14 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं होतं. पण यात सचिन वाझेसह चौघांवर हत्येचा आणि हत्येचा पुरावा लपवल्याचा आरोप होता. सचिन वाढे, सुनील देसाई आणि राजेंद्र तिवारी यांना निलंबित करण्यात आले होते. पण काही वर्षांपूर्वीच त्यांना कामावर घेण्यात आले. 

गँगस्टर लखन भैया हत्या प्रकरण

ख्वाजा युनूसच्या प्रकरणानंतर मुंबई पोलीस पुन्हा एकदा लखन भैय्या हत्या प्रकरणात बदनाम झाली. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा गुंतले गेले. लखन भैय्या उर्फ रामानारायण गुप्ता हा माफिया डॉन छोटा राजनचा खास माणूस होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मुंबई पोलीससोबत एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची टीम त्याचा शोधतात होती. 

11 नोव्हेंबर 2006 ला अचानक एक बातमी आली, दीप शर्माच्या टीमने मुंबई परिसरात लखन भैय्याची हत्या केली. या चकमक प्रकरणात पहिल्या दिवसांपासून अनेक संशय निर्माण झाले होते. लखन भैय्या याचा भाऊ रामप्रसाद यांनी मुंबई पोलिसांवर आरोप करायला सुरुवात केली. त्याने मीडियासमोर सांगितलं की, लखनला 1989 मध्ये अटक करण्यात आली कारण तो एका मित्राकडे बंदूक बाळगून होता. 1997 पर्यंत पोलिसांनी लखनला काही दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली आणि त्याच वर्षी त्याच्यावर शेवटचा गुन्हा दाखल करण्यात आला, असेही रामप्रसाद म्हणाले. पण, 1997 नंतर त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

11 नोव्हेंबर 2006 रोजी प्रदीप शर्माच्या टीमने त्याला आणि त्याचा मित्र अनिल भेडा यांना वसईतून गँगस्टर कायद्यांतर्गत अटक केली. यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी बातमी आली की वर्सोवा इथे नाना नानी पार्कमध्ये लखन भैय्याला चकमकीत ठार केलं. चकमकीनंतर पोलिसांनी लखन भैय्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि सांगितलं की त्याने पोलिसांवर हल्ला केला आणि प्रत्युत्तरा म्हणून केलेल्या गोळीबारात तो मारला गेला. भावाच्या चौकशीच्या मागणीनंतर या प्रकरणात प्रदीप शर्माला मुख्य आरोपी करण्यात आलंय. मात्र नंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, या प्रकरणात 13 पोलीस दोषी आढळले.