Coldplay Concert Tickets : ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्लेने 18 जानेवारी रोजी नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर संगीताचा धमाकेदार कॉन्सर्ट केला. ख्रिस मार्टिनच्या नेतृत्वाखालील या बँडने मुंबईकरांना आपल्या तालावर थिरकवले. कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांची मोठ्या प्रमाणात मागणी होती, मात्र त्याची तिकीट काही भाग्यवान लोकांनाच मिळाली. हजारो लोकांनी या कॉन्सर्टचा आनंद घेतला मात्र एका चाहतीसाठी कॉन्सर्टमध्ये जाण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं.
प्राची सिंह ही कोल्ड प्लेची मोठी फॅन असून तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की कॉन्सर्टला जाण्याआधी तिची तिकीट हरवली आहेत. व्हिडीओमध्ये तिने सांगितले की, 'काल आम्हाला कोल्डप्लेची दोन तिकीट मिळाली होती, जी आम्ही डायनिंग टेबलवर ठेवली होती. आज आम्ही तयार होऊन निघणार होतो, तेव्हा पाहिलं तर तिकीट गायब होती'.
प्राची सिंह हिने व्हिडीओमध्ये सांगितले की, घर काम करणाऱ्या मोलकरणीने घराची साफसफाई करताना तिकीट कचऱ्यात फेकली. प्राची पुढे म्हणाली की "बिल्डिंगचा कचरा एकत्र केला जातो त्या ठिकाणी देखील सफाई कर्मचाऱ्यांनी तिकीट सापडतात का याची तपासणी केली मात्र शेवटी कोल्ड प्ले कॉन्सर्टचे तिकिटं कचऱ्यात सापडू शकली नाहीत. जाऊ देत आज कॉन्सर्टला जाण नशिबात नव्हतं म्हणायचं". व्हिडीओ शेअर प्राचीने आपली व्यथा सांगितली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
कोल्डप्लेचे भव्य दिव्य कॉन्सर्ट्स मुंबईत 18 आणि 21 जानेवारीला होणार आहेत. त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 25 आणि 26 जानेवारीला कोल्डप्ले कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेला आहे.