श्रद्धा कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत, विशेष म्हणजे तिच्या डेटिंग लाइफबद्दल. काही काळापूर्वी अशी अफवा पसरली होती की, श्रद्धा लेखक राहुल मोदीला डेट करत आहे. दोघं अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते, ज्यामुळे या अफवांना पुष्टी मिळाल्यासारखं वाटतं.
13 जानेवारीला पापाराझींनी श्रद्धाला पाहिलं, परंतु त्याच्या पेक्षा तिच्या वॉलपेपरवरील फोटोने अधिक लक्ष वेधून घेतलं. श्रद्धा पिंक हुडी आणि ब्लू जेगिंगमध्ये गाडीकडे जात असताना तिच्या फोनवर राहुल मोदीसोबतचा फोटो दिसला. हा फोटो पाहून चाहते खूपच उत्सुक झाले. एक नेटकऱ्याने कमेंट केली, 'वाह श्रद्धा... प्रेम केलंस तर घाबरायचं कशाला?' तर दुसऱ्या नेटकऱ्याने 'कोण आहे?' असा प्रश्न विचारला आणि तिसऱ्या नेटकऱ्याने 'राहुल मोदी' असे उत्तर दिलं.
श्रद्धाने सुरुवातीला 'R' अक्षराचा नेकलेस घातलेला दिसली आहे, ज्यामुळे या अफवा आणखी वाढल्या होत्या. सतत अफवा असूनही श्रद्धा किंवा राहुल दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीरपणे पुष्टी केलेली नाही.
गेल्या डिसेंबरमध्ये, श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक वडापावचा फोटो पोस्ट करत राहुल मोदीला टॅग केलं होतं. त्यात तिने लिहिलं होतं, 'मी तुम्हाला वडापाव खायला नेहमीचं भाग पाडेन.' या पोस्टनेही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अधिक अफवा सुरू झाल्या होत्या.
हे ही वाचा: छोट्या पडद्यावरील 'ही' अभिनेत्री फक्त 25 मिनिटांच्या शोसाठी घेते तब्बल 2 लाख
श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री 2' या हिट चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2024 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. जगभरात तब्बल 800 कोटी रुपयांची या चित्रपटाने केली. हा चित्रपट 2024 चा सर्वात हिट चित्रपट ठरला आणि भारतात त्याने 564 कोटी रुपयांची कमाई केली.
याशिवाय, मॅडॉक स्टुडिओने नुकतीच 'स्त्री 3' ची घोषणा केली आहे, जो 13 ऑगस्ट 2027 रोजी मोठ्या पडद्यवर रिलीज होईल. श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे, कारण 'स्त्री' फ्रँचायझीच्या पुढील भागाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.