मुंबई : लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) कायमच चर्चेत असते. श्रेया आणि तिचा नवरा शिलादित्य मुखोपाध्याय यांनी गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यांच्या घरी एका चिमुकल्याचं लवकरच आगमन होणार आहे. श्रेयाने स्वतः इंस्टाग्रामवर (Shreya Ghoshal become mother soon, shared baby name) एक पोस्ट शेअर केली आहे. बेबी बंपसह फोटो शेअर केलेत.
३६ वर्षीय श्रेया घोषालने लिहिलं आहे की,'बेबी श्रेयादित्य येणार आहे. शिलादित्य आणि मी ही गोड बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे. जेणे करून आमच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा टप्पा आनंदात पार पडेल.' या पहिल्याच फोटोतून श्रेयाने आपल्या बाळाचं नाव देखील शेअर केलं आहे. (Good News! करीनानंतर 'ही' कलाकार झाली आई)
श्रेयाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सौफी चौधरी म्हणते की, 'हे खूप छान आहे. खूप सारं प्रेम आणि शुभेच्छा.' या प्रमाणेच राघव सच्चर, अस्मित पटेल, संगीतकार शेखर राजवानी आणि शांतनु मोइत्रा यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. (तुम्हाला धक्का बसेल! अनुष्का विराटकडून 'या वस्तू' उधार घेते)
श्रेया घोषालने आपल्या लाँग टाइम बॉयफ्रेंड शिलादित्य मुखोपाध्यायसोबत पाच फेब्रुवारी 2015 रोजी लग्न केलं आहे. हा लग्नसोहळा अतिशय खासगी होता. दोन्ही कुटुंबातील मोजकी लोकं या लग्नाला उपस्थित होते. लग्न हे बंगाली पद्धतीने झालं आहे.
श्रेया चार वर्षांची असल्यापासून गाणं गात आहे. टीव्ही शो सारेगामापमधून तिला संधी मिळाली. श्रेयाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' सिनेमातून गाण्यात डेब्यू केलं आहे. या सिनेमातील 'बैरी पिया' हे अतिशय सुपरहिट ठरलं. 'डोला रे', 'धीरे जलना', 'ये इश्क हाय', 'बरसो रे मेघा', 'दीवानी मस्तानी' आणि 'घूमर' सारखी लोकप्रिय गाणी गायली आहेत.