'पंखा साफ करायची वेळ...'; नेटकऱ्याच्या या खोचक कमेंटवर मिताली मयेकरच्या नवऱ्याचं सडेतोड उत्तर

Siddharth Chandekar : सध्या इन्स्टाग्राम रिल्सची सर्वांनाच सवय असते. मराठी सेलिब्रेटीही इन्स्टाग्राम रिल्स करताना दिसतात. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा असते. परंतु अनेकदा ते ट्रोलही होताना दिसतात. सध्या सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे परंतु त्यावरूनही त्यांना ट्रोल करण्यात आले आहे परंतु यावरही सिद्धार्थ चांदेकर यानं चांगलाच रिप्लाय दिला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 10, 2023, 08:37 PM IST
'पंखा साफ करायची वेळ...'; नेटकऱ्याच्या या खोचक कमेंटवर मिताली मयेकरच्या नवऱ्याचं सडेतोड उत्तर  title=
siddharth chandekar and mitali mayekar gets trolled actor replies with savage answer

Siddharth Chandekar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची. 2021 साली आलेल्या 'झिम्मा' या चित्रपटाच्या यशानंतर आता या चित्रपटाचा पुढचा भाग हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे याची सध्या जोरात चर्चाही रंगलेली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांसमोर आला आहे. सोबत या चित्रपटातील मराठी पोरी हे गाणंही प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. यावेळी या चित्रपटातून दोन नव्या अभिनेत्री प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू यांचा दर्जेदार अभिनय आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटातील मराठी पोरी हे गाणं चांगलंच व्हायरल झालं आहे. या गाण्यावर मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी रिल तयार केलं आहे. 

यावेळी त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्य या रिलचं प्रचंड कौतुक केलं आहे. परंतु काहींनी त्याला सपाटून ट्रोल केलं आहे. मितालीच्या फोटोंवरतीही अनेक नेटकरी तिला ट्रोल करताना दिसतात. त्यावर मिताली त्यांना योग्य ते उत्तर देते त्याच प्रमाणे सिद्धार्थनंही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्याचीही जोरात चर्चा आहे. यावेळी या रिलमध्ये त्यांनी डान्स केला तर आहेच परंतु यावेळी त्यांच्या घरात दिसणाऱ्या फॅनवरून एका नेटकऱ्यानं खाली कमेंट केली की, ''पंखा साफ करायची वेळ आली आहे.'' त्यामुळे त्यांना फार ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावर ''कधी येताय?'' असा रिप्लाय सिद्धार्थनं दिला आहे. त्याच्या खाली एक नंबर रिप्लाय असं म्हणत एका नेटकऱ्यानं सिद्धार्थचं कौतुक केले आहे. 

सेलिब्रेटी हे अनेकदा आपल्यावरील सोशल मीडिया ट्रोलिंगला इन्गोर करतात परंतु काही सेलिब्रेटी हे त्यांना योग्य तो रिप्लाय देतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा असते. मध्यंतरी अभिनेत्री मिताली मयेकर हिला देखील तिच्या बिकीनी फोटोंवरून प्रचंड ट्रोल केले जाते. त्यामुळे तिची चर्चा असते. या ट्रोलर्सनी ती योग्य तो रिप्लायही देताना दिसते. त्यामुळे तिची विशेष चर्चा असते. 

हेही वाचा : सुपरस्टार रजनीकांत यांचा साधेपणा, चक्क चाहत्याच्या घरी जाऊन दिलं सरप्राईज... व्हिडिओ व्हायरल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे अनेकदा आपले ट्रॅव्हल व्हिडीओज हे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते सध्याही त्यांची बरीच चर्चा आहे.