Raj Kundra च्या डर्टी पिक्चर प्रोजेक्ट 'ख्वाब'चा ईमेलमुळे खुलासा

डर्टी पिक्चरमधील कॅमेरा एँगल ते एक एक सीनचा या मेलमध्ये खुलासा 

Updated: Jul 23, 2021, 10:45 AM IST
Raj Kundra च्या डर्टी पिक्चर प्रोजेक्ट 'ख्वाब'चा ईमेलमुळे खुलासा title=

मुंबई : सॉफ्ट पॉर्नोग्राफी केस (Soft Pornography Case) प्रकरणात दररोज नव नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आता एक ईमेलमधून राज कुंद्राच्या डर्टी पिक्चर प्रोजेक्ट 'ख्वाब'चा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये पॉर्नच्या लाइव स्ट्रीमिंगचं पूर्ण प्लानिंग केलं आहे. याकरता अगदी सिनोप्सिस देखील तयार आहे. (Soft pornography Case email revealed of Raj Kundra Khwaab Synopsis )  या सिनोप्सिसमध्ये 10 मुद्यांवर चर्चा झालेली आहे. 

कॅमेरा एँगल ते एक एक सीनची इतंभूत माहिती 

14 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी पारस आंधवा आणि ज्योती ठाकूर नावाच्या दोन लोकांना ईमेल पाठवण्यात आलं आहे. ईमेलमध्ये HotShot हेड म्हणून लिहिलेल्या प्रोजेक्ट 'ख्वाब' मध्ये याबाबत सगळी माहिती लिहीली आहेत.

यामध्ये शुटिंग कशी असेल? कॅमेऱ्याचा कोणता एँगल सेल. लाइव स्ट्रिमिंग करणारा आर्टिस्ट जास्तित जास्त दिसेल याची काळजी घ्या. OTT प्लॅटफॉर्मवर सब्सक्राइबरला वाढवलं पाहिजे. ही सगळी माहिती ईमेलद्वारे दिली आहे. यासोबतच अभिनेत्रीला कोणत्याही प्रकारे बोल्ड आणि न्यूड व्हायचं आहे. ईमेलमध्ये ही गोष्ट देखील सांगितली आहे. 

प्रोजेक्टमधून ईमेलची सगळी माहिती 

1. फाइनल मूवी MP4 मध्ये राहील. 
2. प्रोट्रे्ट पोस्टर वेगवेगळ्या साइजमध्ये असतील 
3. सोशल मीडियाकरता बोल्ड पोस्टर असतील. तर काही सामान्य 
4. लँडस्कॅप पोस्टर देखील असणार 

ईमेलमध्ये प्रोजेक्ट 'ख्याव' ची संपूर्ण माहिती 

1. 15 सेकंदाचा सामान्य टीझर पहिला असेल 
2. एक 60 ते 90 सेकंदाचा बोल्ड ट्रेलर असेल. जो ऍपवर टाकला जाईल. 
3. सोशल मीडियाकरता 60 ते 90 सेकंद नॉन बोल्ड ट्रेलर देखील असेल. 
4. 2 ते 3 मिनिटांत नॉन बोल्ड व्हिडीओ गाणे दाखवले जातील. 

एका व्हिडिओकरता 3 लाख रुपये 

ईमेलमध्ये सिनोप्सिसनंतर पेमेंटचा देखील उल्लेख केला आहे. व्हिडीओ Hotshot  डिजिटल टीमच्या म्हणण्यानुसार, आपल्या ऍपनुसार जर हा व्हिडीअ असेल तर त्याला खरेदी केलं जाईल. याच्या बदल्यात 3 लाख रुपये देण्यात येतील. यासह, त्याचे सर्व अधिकार आणि बौद्धिक मालमत्तेचे अधिकार देखील हॉटशॉट डिजिटलवर राहील. वरिष्ठ टीमला हा व्हिडिओ आवडत नसल्यास आपण तो इतरत्र विकण्यास मोकळा आहात.