मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने यापूर्वी गरजू लोकांना बरीच मदत केली आहे. हेच कारण आहे ज्यामुळे, लोकं सोशल मीडियावर सोनू सूदचं अत्यंत कौतुक करतात. इंटरनेटच्या दुनियेत सोनू सूदच्या मदतीचंही खूप कौतुक होत असतं. पण, महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक सोनू सूद सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे. सोशल मीडियावर सोनू सूदची फजिती झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
#WeTheHellAreUSonuSood ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. खरं तर असं झालं की, सोनू सूदने महाशिवरात्रीवर केलेल्या ट्विटवरून शिवभक्तांचा राग अनावर झाला आहे. सोनू सूदने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'महादेवांचा फोटो शेअर न करता गरिबांची मदत करत महाशिवरात्री साजरी करा.ओम नमः शिवाय' अशा आशयाचं ट्विट सोनूनं केल्यानंतर नेटकरी मात्र त्याच्यावर भडकल्यांच चित्र पहायला मिळत आहे.
शिव भगवान की फोटो फॉरवर्ड करके नहीं किसी की मदद करके महाशिवरात्रि मनाएं।
ओम नमः शिवाय ।— sonu sood (@SonuSood) March 11, 2021
सोनूच्या याच ट्विटवर लोक भडकले आणि त्यांनी #WhoTheHellAreUSonuSood या हॅशटॅगने त्याला त्रास देणं सुरू केलं. एका नेटकऱ्यानं लिहिले की, ''कृपया आम्हाला हिंदू धर्माबद्दल विनामूल्य ज्ञान देऊ नका. हे खरोखरच लाजिरवाणं आहे''. तर एकानं, ईदच्या निमित्ताने त्याने केलेल्या ट्विटचे स्क्रिनशॉट शेअर करत त्याला ट्रेल केलं.
यावर एका नेटकऱ्याने लिहिलं की, "व्वा, वेडेपणाची काहीतरी मर्यादा असते, तुम्ही हे अफाट ज्ञान आणलं कोठून… तेही, फक्त हिंदू सणांवर. तर अजून एका युर्जसनं लिहलंय की, " लॉकडाऊनच्या वेळी तू लोकांना मदत केलीस हे चांगलं आहे, पण तुला हा अधिकार नाही, की हिंदू धर्माचा सण कसा साजरा करायचा. अश्याप्रकारचे अनेक ट्विट करत नेटकऱ्य़ांनी सोनूवर नाराजी व्यक्त केली आहे.