Agastya Nanda Suhana Khan: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन एकीकडे त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंब हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. तर सध्या अभिषेक हा त्याचा भाचा आणि भाची या दोघांसोबत एका लग्झरी गाडीत स्पॉट झाला. या दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान देखील दिसली. तर ही व्हायरल पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
खरंतर, सुहानाचं नाव नेहमीच अगस्त्य नंदाशी जोडण्यात येतं. तर अभिषेक, नव्या नवेली नंदा, अगस्त्य आणि सुहाना हे चौघे वांद्रेच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे पाहायला मिळाले. तर अनेक नेटकरी बोलत आहेत की बच्चन कुटुंबात नवी सुन येणार आहे? हा प्रश्न नेटकऱ्यांनी यासाठी केला आहे कारण समोर आलेल्या फोटोत सुहाना आणि अगस्त्य हे अभिषेक बच्चन आणि नव्या नवेली नंदासोबत एकाच गाडीत दिसले. सुहानाचं कुटुंब हे बच्चन कुटुंबाच्या जवळचं आहे. अशात कथित कपल एकत्र दिसल्यानं सगळीकडे त्यांचीच चर्चा रंगली आहे. त्यामुळेच ते 'सुहाना खानला बच्चन कुटुंबाची सुन' असं म्हणत आहेत.
एक नेटकरी म्हणाला, 'याचा अर्थ यांच्या अफेअरच्या चर्चा अगदी योग्य होत्या.' तर अनेक नेटकरी हे 'सुहाना खान ही बच्चन कुटुंबाची सुन होणार' या कमेंटवर लाईक करताना दिसत आहेत.कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुहाना आणि अगस्त्य या दोघांनाही ओटीटीवर खूप प्रेम मिळाल्यानंतर ते आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यांच्या 'द आर्चिज' या चित्रपटाला सगळ्यांचं प्रेम मिळालं.
हेही वाचा : जान्हवी कपूरने पुन्हा केली नाकाची सर्जरी? नवीन फोटोमुळे चर्चांना उधाण
दरम्यान, फक्त अगस्त्य आणि सुहानाच्या मैत्रीमुळे ते एकत्र आले नाही तर त्याचं कारण अभिषेक हा सुहाना आणि शाहरुख खानच्या आगामी KING या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वत: अमिताभ यांनी या बातमीला दुजोरा दिला होता. खरंतर, अभिषेक आणि शाहरुख यांनी या आधी देखील एकत्र काम केलं आहे. पण लेक सुहाना खानसोबत दोघं पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सध्या त्यांच्या या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे.