मुंबई : अभिनेता सनी देओल कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेत्यावर फसवणूक, खंडणी आणि बनावटगिरीचे धक्कादायक आरोप केले गेले आहेत. चित्रपट निर्माते सौरव गुप्ता यांनी अभिनेता सनी देओलवर हे आरोप केले आहेत. सनडाउन एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक सौरव गुप्ता यांनी अभिनेत्यावर आरोप केले आहेत की, अभिनेता सनीने आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. रिअल इस्टेट डेव्हलपरच्या म्हणण्यानुसार, त्याने 2016 मध्ये एका चित्रपटासाठी देओलशी संपर्क साधला होता आणि त्यासाठी त्याला आगाऊ रक्कमही दिली होती. यासंदर्भात इंडिया टुडेशी बोलताना सौरव म्हणाला, सनी देओलने चित्रपटाला उशीर केला आणि पैसेही घेतले. मात्र त्यावर काम सुरू केलं नाही.
निर्माता पुढे म्हणाला, 'आम्ही त्याला साइनिंग अमाउंट म्हणून एक कोटी रुपये दिले. आमचा चित्रपट सुरू करण्याऐवजी, त्याने 2017 मध्ये पोस्टर बॉईजमध्ये काम करणे निवडलं. मी त्याला 2.55 कोटी रुपये दिले आणि त्याच्या विनंतीवरून स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकही बदलला. शूटिंग सुरू करण्यासाठी आम्ही स्टुडिओही बुक केले.
निर्माता पुढे म्हणाला, ''पण सर्व काही व्यर्थ गेलं. त्यांनी आणि त्यांच्या टीमने आमचा विश्वासघात केला आहे. गेल्या वर्षी सनी देओलने साइनिंग अमाउंटही घेतली होती. तो म्हणाला, 'आम्ही साईनची रक्कम 4 कोटी रुपये निश्चित केली होती, मात्र जेव्हा आम्ही करार पाहिला तेव्हा ती 8 कोटी रुपये होती. त्याने नफा वाटणीची रक्कम 2 कोटी रुपये देखील जोडली. जेव्हा मी या गोष्टी सांगितल्या तेव्हा त्याच्या टीमने आम्हाला कोणतंही उत्तर दिलं नाही. आम्ही नोटीसही पाठवली, पण तो देशात नसल्याचं त्याच्या टीमने सांगितलं.''
निर्माता पुढे म्हणाला, ''मी एक बाहेरचा माणूस आहे जो चित्रपट बनवण्यासाठी इंडस्ट्रीत आलो आहे. तथापि, माझी फसवणूक झाली आहे आणि ती कधी संपेल हे मला माहीत नाही. मी माझ्या कष्टाने कमावलेला पैसा एका शक्तिशाली माणसाच्या हातून गमावला आहे. अर्थात त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा नाही, मला फक्त न्याय हवा आहे आणि माझे पैसे परत हवे आहेत.'' असं निर्माता दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.'' मात्र या संपुर्ण प्रकरणानंतर अद्यापतरी सनी देओलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.''