Soundarya Sharma Hollyood Debut: प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्टनंतर सौंदर्या शर्मा हॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिने स्वप्न पूर्ण होतात त्यामुळे स्वप्न पाहणे बंद करू नका असं तिने म्हटलं आहे. 'हाउसफुल 5' मधील सौंदर्या म्हणाली की, मी खूप खूश आहे. मी फक्त ऐवढच म्हणू शकते की, स्वप्न पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही स्वप्न पाहणे बंद करू नका. 2024 खूपच खास आहे. 'हाउसफुल 5' ला सुरुवात झाली. ज्याचे सर्व श्रेय एनजीई आणि मेरी 'गॉडसिस्टर' वरदा नाडियाडवालाकडे जाते. ज्याची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे.
पुढे अभिनेत्री म्हणाली की, मी माझ्या प्रोजेक्टसाठी एक वर्षापूर्वी काही सीक्वेन्स शूट केले होते. परंतु ते पूर्ण होईपर्यंत मला जास्त बोलायचे नाही. कारण मी थोडी अंधश्रद्धाळू आहे. जानेवारीमध्ये लॉस एंजेलिस आणि फ्रान्समधील माझे शेवटचे वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मात्र, मी या प्रकल्पाबद्दल जास्त काही सांगणार नाही. पण लवकरच सर्व काही तुमच्यासोबत शेअर करेन.
सौंदर्या शर्माचे कॅप्शन चर्चेत
सौंदर्या शर्माने सोशल मीडियावर दिग्दर्शक चैड स्टेल्स्की यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, शेवटी, मला ही पोस्ट करावी लागली. ते म्हणतात ना स्वप्नातील स्वप्न सत्यात उतरतात. जॉन विक मालिकेचा निर्माता आणि दिग्दर्शक आणि माझा सर्वात चांगला मित्र, काही रोमांचकासाठी जानेवारीमध्ये लॉस एंजेलिसला जाण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. देव दयाळू आहे. हॉलीवूड कॉलिंग. असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
हाउसफुल 5 मध्ये दिसणार सौंदर्या शर्मा
अमेरिकन स्टंटमॅन आणि निर्माता स्टेल्स्कीला एटॉमिक ब्लोंड आणि अनेक प्रोजेक्टसाठी ओळखला जातो. 'ट्रांसफॉर्मर्स', 'द मैट्रिक्स', 'सेरेनिटी', 'एक्स-मेन ऑरिजिंस: वूल्वरिन', 'द एक्सपेंडेबल्स', 'जी.आई. जो: रिटेलिएशन', 'इम्मोर्टल्स'सह मोठ्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणून प्रसिद्ध आहे. लवकरच ती अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल 5' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सौंदर्या शर्मासोबतच डिनो मोरिया, जॅकलिन फर्नांडिस, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, नर्गिस फाखरी आणि सोनम बाजवा हे देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 5 जून 2025 रोजी रिलीज होणार आहे.