'तारक मेहता..'तली दयाबेन या दिवशी पुन्हा परतणार

दिशा आता पुन्हा तारक मेहताने कमबॅक करत आहे.

Updated: Sep 8, 2018, 12:50 PM IST
'तारक मेहता..'तली दयाबेन या दिवशी पुन्हा परतणार title=

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधली दयाबेन म्हणजेच दिशा वकानी गेल्यावर्षीपासून सुट्टीवर आहे. गेल्यावर्षी तिने स्तुती या गोंडस मुलीला जन्म दिला. नव्या वृत्तानुसार दिशा आता पुन्हा तारक मेहताने कमबॅक करत आहे.

रेटींग चांगले

 

A post shared by Disha Vakani (@official_disha_vakani) on

दिशाने लवकरच शोमध्ये पुनरागम कराव यासाठी तिच्याशी बोलण सुरू असल्याचे सांगण्यात येतंय. जर सर्वकाही ठिक असेल तर पुढच्या दोन महिन्यात दिशा शोमध्ये दिसेल असे सांगण्यात येतंय. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलंय. दिशाच्या अनुपस्थितीतही शोचे रेटींग चांगले आहे.

स्तुतीचा संभाळ 

दिशाला याबद्दल विचारण्यात आल पण तिने याबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नाही. गेल्यावर्षी 30 नोव्हेंबरला दिशाने स्तुतीला जन्म दिला. त्यानंतर ती आता स्तुतीचा संभाळ करत आहे. 2015 मध्ये दिशाने चार्टड अकाऊंटट असलेल्या मयूर पांडियासोबत लग्न केलं. गेल्या दहा वर्षांपासून ती या शोमध्ये आहे.

डॉ हाथीची एन्ट्री 

 

A post shared by Disha Vakani (@official_disha_vakani) on

आता या मालिकेत सगळे गणरायाच्या आगमनाची तयारी करत आहेत. असं असतानाच या गणपतीच्या दिवसात डॉ. हाथी प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. गणेश चतुर्थीपासून निर्मल सोनी हे डॉ हाथीचं कॅरेक्टर साकारणार आहेत. निर्मल सोनी यांनी या अगोदर देखील डॉ हाथीचं कॅरेक्टर  साकारलं आहे. हा एपिसोड 13 सप्टेंबर म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी दाखवला जाणार आहे. 

शोमध्ये नव्या डॉ हाथी यांची एन्ट्री होणार आहे. शोचे प्रोड्यूसर असित मोदीने काही दिवसांपूर्वी सांगितलं की, डॉ हाथी हा अजूनही शोचा भाग आहे. त्या पात्राकरता नवीन कलाकाराची शोध सुरू आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, या शोमधूनच आझाद यांच घर चालत होतं. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे घरच्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 'तारक मेहता' या शोने डॉ हाथी यांनी जेवढी लोकप्रियता मिळवून दिली तेवढेच पैसे देखील मिळवून दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आझाद एका दिवसाकरता शुटिंगचे 25 हजार रुपये आकारत असे. प्रत्येक दिवसानुसार कॉन्ट्रक्टनुसार हाथी एका महिन्यात जवळपास 7 लाख रुपये कमवत असे.