मुंबई : पल्लवी जोशी तिच्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटातून बरीच चर्चेत आली होती. या चित्रपटात तिने प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. काश्मीर फाईल्स हा सिनेमा ऑस्करसाठी निवडला गेला आहे.
2022 मध्ये 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी सध्या त्यांच्या आगामी 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्याचवेळी सेटवरून पल्लवी जोशीला दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे.
मार्च 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'द काश्मीर फाइल्स'ला ट्रोलिंगसोबतच लोकांकडून भरभरून प्रेमही मिळालं. या चित्रपटाने जगभरातून बॉक्स ऑफिसवर 340 कोटींहून अधिक कमाई केली. हा चित्रपट 2022 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. त्याचबरोबर, नुकतंच या चित्रपटाला आणखी एक मोठं यश मिळालं आहे.
'द काश्मीर फाइल्स' ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार हे देखील दिसले होते. 'द कश्मीर फाइल्स'च्या यशानंतर विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात नुकतीच 'कंतारा' अभिनेत्री सप्तमी गौडा हिचीही एन्ट्री झाली आहे.
हैद्राबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री पल्लवी जखमी झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, एका वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि अभिनेत्रीला धडक दिली, त्यानंतर अभिनेत्री जखमी झाली. काही दिवसांपूर्वीच 'द व्हॅक्सिन वॉर'चं शूटिंग सुरू होतं, ज्याची माहिती विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडियावरून दिली होती. त्याचवेळी चित्रपटाच्या सेटवरून पल्लवी जोशीच्या दुखापतीची बातमी समोर आली आहे.
जखमी झाल्यानंतरही केलं शूट पूर्ण
पल्लवी जोशीला कारने धडक दिली आणि ती जखमी झाली, त्यानंतरही तिने तिचा सीन पूर्ण केला आणि त्यानंतर ती उपचारासाठी गेली, असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. तिच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येतंय.