मुंबई : चित्रपटांचे कथानक आणि त्या कथानकांची गरज पाहता प्रत्येक कलाकृतीमध्ये हल्ली कमी जास्त प्रमाणात काही प्रणयदृश्य, अर्थात इंटिमेट सीन साकारण्यात येतात. खास दिग्दर्शकांच्या मदतीनं अशा प्रकारची दृश्य साकारण्याचा घाट घालण्यात येतो. आश्चर्याची बाब म्हणजे हल्ली हीच दृश्य कलाकृतीला चर्चेतही आणण्याचं काम करतात.
असो. असाच एक चित्रपट त्यामध्ये असणाऱ्या बोल्ड दृश्यांमुळे चर्चेत आला होता. हा चित्रपट म्हणजे Fifty Shades Of Grey. या चित्रपटातून अभिनेत्री Dakota Johnson च्या मादक सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ करण्याचं काम केलं होतं.
याच अभिनेत्रीकडून नुकताच अभिनेता Jamie Dornan सोबतच्या नात्याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. या मुलाखतीदरम्यान तिनं Fifty Shades Of Grey मध्ये बोल्ड चित्रपट कोणत्या पद्धतीनं चित्रीत करण्यात आले इथपासून आपल्या खासगी आयुष्यातीलही काही गोष्टी उघड केल्या.
या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये एकाहून एक इंटिमेट सीन्सचा भरणा होता. अभिनेत्रीचा समुद्र किनारी असतेवेळचा एक टॉपलेस फोटोही व्हायरल झाले होते. किंबहुना तिच्यासोबत दिसणाऱ्या अभिनेता जेमी डोर्ननसोबत तिचं भांडणही झाल्याचं म्हटलं गेलं. पण, त्याच्याशी असणाऱ्या नात्याबद्दल सांगताना डोर्नन माझ्यासाठी भाऊ... असं म्हटलं.
चित्रपटातील अडल्ट दृश्यांच्या वेळी आपण आणि जेमी एकमेकांवर विश्वास ठेवत एकमेकांची काळजीही करायचो असं तिनं सांगितलं. अशी कोणतीह वेळ नव्हती, जेव्हा आम्ही एकत्र नसायचो असंही तिनं सांगितलं. ऐकण्यास विचित्र वाटेल, पण तो माझ्यासाठी भावाप्रमाणेच आहे असंही ती म्हणाली.