Viral Video: 'डिंग डॉंग' गाण्यावर या ३ मुलींचा अफलातून डान्स !

आजकाल बॉलिवूडमधील ट्रेडींग गाण्यावर स्वतःच्या काही स्टेप्स बसवून डासिंग व्हिडिओ करण्याचा ट्रेंड आहे. यामध्ये आता 'डिंग डॉंग़' गाण्याचीही भर पडली आहे.  

Updated: Aug 18, 2017, 07:01 PM IST
Viral Video: 'डिंग डॉंग' गाण्यावर या ३ मुलींचा अफलातून डान्स !  title=

 मुंबई : आजकाल बॉलिवूडमधील ट्रेडींग गाण्यावर स्वतःच्या काही स्टेप्स बसवून डासिंग व्हिडिओ करण्याचा ट्रेंड आहे. यामध्ये आता 'डिंग डॉंग़' गाण्याचीही भर पडली आहे.  
 
 टायगर श्रॉफ आणि निधि अग्रवाल यांच्या 'मुन्ना मायकल' चित्रपटातील 'डिंग डॉंग' हे गाणं तरूणांमध्ये खूपच पॉप्युलर झालं आहे.  या 'डिंग डॉंग' गाण्याची क्रेझ या तीन मुलींवरही आहे. 
 

 DeepaDance या युट्युब  चॅनलवर  एक खास व्हिडिओ  अपलोड करण्यात आला आहे. 'डिंग डॉंग' गाण्यावर त्या अफलातून नाचताना दिसत आहेत. त्यांची डान्स धमाल पाहून हा व्हिडिओ इंटरनेटवर खूपच  झपाट्याने व्हायरल होत आहे. 

३१ जुलैला हा व्हिडिओ यु ट्युब वर टाकण्यात आला आहे.  पण ३ दिवसांमध्येच या व्हिडिओला ९३,८११ लोकांनी पाहिले आहे. तसेच लोकांनी त्यावर भरभरून कमेंट्सही केल्या आहेत.