मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कपल्स आहेत. त्यापैकी एक खूप लोकप्रिय होती. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफने कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही परंतु दोघंही अनेकदा एकत्र दिसले आहेत. यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत होत्या.
कॉफ़ी विथ करणच्या सीझनचा नवीन एपिसोडमध्ये टायगर श्रॉफ क्रिती सॅननसोबत दिसला आणि इथे त्याने दिशाबद्दल त्याला काय वाटतं ते अगदी खरं सांगितल आणि इतकंच नाही तर शोच्या मध्यभागी टायगरने दिशाला हाक मारली.
ब्रेकअपनंतर टायगरला आठवली दिशा!
कॉफ़ी विथ सीझनच्या ताज्या एपिसोडमध्ये, टायगर श्रॉफ, लाजताना दिसतोय, तो त्याच्या न बोललेल्या शब्दांबद्दल आणि भावनांबद्दल खूप बोलला होता. करण जोहरने विचारल्यावर टायगरने सांगितलं की, तो आतापर्यंत सिंगल नव्हता. एवढंच नाही तर टायगरने त्याच्या लैंगिक आयुष्याबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
बॉलीवूडमध्ये कोणाची फिगर सर्वोत्कृष्ट आहे, असं त्याला विचारलं असता टायगरने चटकन दिशाचं नाव घेतलं. टायगरने असंही सांगितलं की, तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत जिममध्ये आणि नंतर सॉनामध्ये टाईम स्पेंड करायचा. टायगरच्या बोलण्यातून असं वाटतं की, तो अजूनही दिशाला मिस करतोय.
चॅट शोच्या शेवटच्या भागात, करण त्याच्या पाहुण्यांसोबत एक गेम खेळतो. ज्यामध्ये तो इंडस्ट्रीतील कोणत्याही स्टारला फोन करतो, 'हे करण इट्स मी!' असं या सेगमेंटचं नाव आहे. यामध्ये त्याने क्रिती टायगरची एक्स गर्लफ्रेंड दिशाला फोन केला. दिशानेही आरामात फोन उचलला आणि करणला 'अरे करण इट्स मी' म्हणाली.
टायगरने त्याच्या आणि दिशाच्या नात्यावर म्हटलं आहे की, ते आधीही आणि आजही खूप चांगले फ्रेंण्ड्स आहेत.